शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:13 IST

israel and Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करून युद्धाची सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच हमासने युद्ध न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असाही त्यांना इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, प्रत्येकाला घरी पोहोचायचे आहे आणि हे युद्ध संपवायचे आहे. इस्रायलींनी माझ्या अटी मान्य केल्या आहेत. आता हमासनेही स्वीकारण्याची वेळ आली आहे. मी हमासला अटी मान्य न करण्याच्या परिणामांबद्दल इशारा दिला आहे. ही माझी शेवटची चेतावणी आहे, आता अशी कोणतीही चेतावणी येणार नाही! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद." 

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून एक हजाराहून अधिक लोकांना ठार केले, ज्यावर संपूर्ण जगाने टीका केली. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत हमासविरुद्ध मोहीमही सुरू केली. हमासच्या मते, आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात ६३ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १ लाख ६० हजार ९१४ लोक जखमी झाले, अशी माहिती आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन प्रस्तावावर इस्रायल गंभीरतेने विचार करत आहे. या प्रस्तावानुसार, युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी हमासला 48 लोकांना सोडावे लागेल. त्या बदल्यात इस्रायलला हजारो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल. याव्यतिरिक्त, गाझा पट्टीत युद्धबंदी कशी लागू करायची यावरही चर्चा होईल. एका इस्रायली अधिकाऱ्याने यावर जास्त भाष्य करणे टाळले असले तरी, हा प्रस्ताव गांभीर्याने विचारात असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, युक्रेनवरील हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला थेट इशारा दिला आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले होते. मात्र, रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे युक्रेन आणि रशियामधील चर्चा होऊ शकली नाही. आता रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्ध