दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:41 IST2025-11-08T20:39:16+5:302025-11-08T20:41:27+5:30
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण थांबल्याचे वृत्त आहे.

दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग आणि उड्डाण थांबवण्यात आली आहेत. तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.
धावपट्टीवरील लाईटमध्ये तांत्रिक बिघाड आहे, यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे विस्कळीत होत आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रेंजी शेर्पा म्हणाले की, धावपट्टीवरील एअरफील्ड लाइटिंग सिस्टममध्ये बिघाड झाला आहे. सध्या किमान पाच उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. विमानतळावरून येणारी आणि जाणारी सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे उशिराने सुरू आहेत. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:३० च्या सुमारास ही समस्या आढळून आली.
शुक्रवारी, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली. विविध विमान कंपन्यांच्या ८०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला, यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
All flight movement in Nepal's Tribhuvan International Airport halted following a technical glitch in the lights along the runway, according to airport officials
— ANI (@ANI) November 8, 2025
More details awaited.