शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या अजेंड्यासाठी आता इस्लामचा वापर करतोय तालिबान; इमामांना दिला मोठा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:30 IST

यापूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानच्या इमामांना आदेश दिला होता, की त्यांनी आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत, शुक्रवारच्या नमाज निमित्त जनतेला योग्य माहिती द्यावी. तसेच, अफगाणिस्तान सोडू नये, असेही सांगावे. (taliban using islam for agenda now)

काबूल - अफगाणिस्तानवर ताब्यात मिळविल्यानंतर आता तालिबानने आपल्या हेतूसाठी इस्लामचा वापर करायलाही सुरुवात केली आहे. तालिबानने देशातील सर्व इमामांना, सरकारच्या नियमांचे पालन कसे करावे, हे शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान लोकांना सांगायला सांगितले आहे. गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 100 जनांचा मृत्यू झाला. यानंतर तालिबानने हा निर्णय घेतला आहे. (Afghanistan taliban using islam for agenda now says imams to preach about obedience at friday prayers)

यापूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानच्या इमामांना आदेश दिला होता, की त्यांनी आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत, शुक्रवारच्या नमाज निमित्त जनतेला योग्य माहिती द्यावी. तसेच, अफगाणिस्तान सोडू नये, असेही सांगावे.

पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

तालिबानने इमामांना सांगितले, की आपण आमच्याविरोधात सुरू असलेल्या नकारात्मक प्रचाराचा प्रतिकार करा आणि लोकांना देश सोडण्यापासून रोखा. खरे तर, तालिबान आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ते इमामांचाही उपयोग करून घेत आहेत.  तालिबानला अफगाणिस्तानात संपूर्ण इस्लामिक शासन हवे आहे आणि त्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. गुरुवारीच अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 13 अमेरिकन सैनिकांसह जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे.

 या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट-खोरासनने घेतली आहे. स्फोट झाला तेव्हा, म्हणजेच गुरुवारी काबूल विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते. याच वेळी आत्मघाती हल्लेखोर कंबरेला स्फोटके लावून आत आला होता आणि त्याने स्वत:च उडवले. विशेष म्हणजे तालिबानच्या माघारीमुळे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले जाण्याची भीती आहे. विशेषतः महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रचंड निर्बंध लादले जाऊ शकतात.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIslamइस्लामTerrorismदहशतवाद