शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"एअर स्ट्राईकचा बदला घेऊ"; १९ जणांच्या मृत्यूमुळे अफगाणिस्तान आक्रमक, पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 08:35 IST

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत.

अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने आम्ही पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचं मूल्यमापन करत असल्याचं म्हणत प्रतिहल्ल्याचा इशाराही दिला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनात पाकिस्तानवर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आणि निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप केला.

"पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भूभागात घुसखोरी केली आहे. काल रात्री त्यांनी नंगरहार आणि पक्तिका प्रांतात आमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह अनेक लोक मारले गेले आणि जखमी झाले. पाकिस्तानी जनरल अशा गुन्ह्यांद्वारे स्वतःच्या देशातील सुरक्षा त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत" असं म्हटलं आहे. पाकिस्तानी  एअर स्ट्राईकमध्ये एकाच कुटुंबातील १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अफगाण तालिबानच्या सूत्रांनी सांगितलं की, अधिकारी या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या व्याप्तीची चौकशी करत आहेत. अद्याप अफगाण तालिबानकडून कोणत्याही तात्काळ प्रतिक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, नेतृत्वाने प्रतिहल्ल्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत. सूत्रांनी तालिबानच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "पाकिस्तानने अफगाण हवाई क्षेत्राचे उल्लंघन केलं आहे आणि अफगाणिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. याचा बदला घेऊ. आम्ही योग्य वेळी प्रतिहल्ला करू."

अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू

पक्तिका आणि नंगरहारमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर, तालिबान प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी काबुल आणि कंदहारमध्ये तातडीच्या बैठका बोलावल्या आहेत. सूत्रांनी सांगितलं की, "पाकिस्तानी हल्ल्यांवर आताच निश्चितपणे काहीही सांगणं घाईचं ठरेल, परंतु काबुल नक्कीच प्रत्युत्तर देईल." यावरून असे संकेत मिळत आहेत की, अंतर्गत विचारविनिमयानंतर अफगाण तालिबानकडून पाकिस्तानी हल्ल्यांविरुद्ध औपचारिक प्रतिक्रिया दिली जाऊ शकते.

दुसरीकडे, पाकिस्तानने दावा केला आहे की सीमा ओलांडून केलेल्या  एअर स्ट्राईकचा उद्देश दहशतवादी यंत्रणांना लक्ष्य करणं हा होता. पाकिस्तानी सैन्याने म्हटलं आहे की, अफगाणिस्तानच्या पक्तिका, पक्तिया, नंगरहार आणि खोस्त प्रांतात केलेल्या अचूक हल्ल्यांमध्ये दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले आहेत. पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या हद्दीत ड्युरंड लाईन (अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा) जवळ अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan Threatens Retaliation After Pakistan Airstrikes Kill 19

Web Summary : Afghanistan vows retaliation after Pakistani airstrikes killed 19, including women and children, near the border. Taliban officials are assessing the damage and considering options, signaling a potential counter-attack. Pakistan claims the strikes targeted terrorist hideouts across the Durand Line.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी