शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:58 IST

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. अशरफ गनी ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची होती माहिती. 

ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश.अशरफ गनी ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची होती माहिती. 

अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहेत. दरम्यान, गनी हे ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु ताजिकिस्ताननं अशरफ गनी यांचं विमान उतरवण्यास परवानगी दिली नाही. यानंतर ते ओमानला रवाना झाले. ओमानवरून ते अमेरिकेत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानचे सुरक्षा सल्लागार मोहिब हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. 

दरम्यान, अशरफ गनी यांनी आपण का देश सोडला यासंदर्भात माहिती दिली होती. "माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं."मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाairplaneविमानPresidentराष्ट्राध्यक्ष