शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:20 IST

Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul : राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे.

काबुल : तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांचा ताबा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे. राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचे तालिबानने जाहीर केले. (Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul)

तालिबान्यांनी सकाळीच काबुलला वेढा देत महत्त्वाची प्रवेशकेंद्रे ताब्यात घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सरकारने शरणागती पत्करली. अन्य महत्त्वाची शहरे तालिबान्यांनी आधीच  ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासमोर फारसे पर्याय शिल्लक नव्हते. दुपारनंतर तालिबानी बंडखोरांनी काबुलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या सेनेने पांढरे कपडे घालून शरणागती पत्करली. सत्ता परिवर्तन सुरळीतपणे पार पडल्यास हानी पोहोचविण्यात येणार नाही, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे. तालिबानने दहा दिवसांत मजार-ए-शरीफ, जलालाबादचा ताबा घेतला. मजार-ए-शरीफ हे तालिबानविरोधी शहर मानले जाते. त्यानंतर जलालाबाद  या शहराचा ताबा प्रतिकार न करता तालिबानला मिळाला. भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली नसून सध्या तेथे अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

जलालींकडे सत्तातालिबानचा नेता मुल्ला बरादर याच्याशी बोलल्यावर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. अली अहमद जलाली याच्याकडे सत्ता सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या विमानाच्या तासभर घिरट्याकाबुलमधून भारतीय दूतावासातील कर्मचारी व इतर नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात आले होते. मात्र, ते काबुलमध्ये दाखल होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. विमानतळावर एटीसीचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे विमान तब्बल एक तास काबुलच्या विमानतळाजवळ घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी वैमानिकांनी काही काळासाठी विमानाचे रडारही बंद केले होते. अखेर विमान उतरविण्यात आले. दूतावासातील सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन विमान मायदेशी परतले. 

दूतावासातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेने केले एअरलिफ्ट तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले. त्यापूर्वी सर्व संवेदनशील माहिती डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघारी सुरू केल्यानंतर तालिबानने हळूहळू भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

बदला घ्यायचा नाहीतालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. सरकार आणि लष्करात सेवा देणाऱ्यांना माफ करण्यात येईल. नागरिकांनी घाबरू नये. कोणीही भीतीने देश सोडून जाऊ नये, असे आवाहनही केले. मात्र, नागरिकांनी भीतीपोटी काबुल सोडण्यास सुरुवात केली असून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान