शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

देश सोडण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून जाताहेत लोक, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:33 PM

Afghanistan Crisis: देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.

नवी दिल्ली:अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. तेथील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी नागरिक एका चालत्या विमानाच्या पंखांवर बसलेले दिसत आहे. या गर्दीतील एका व्यक्तीनं आपल्या फोनवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओतील लोकांचं पुढे काय झालं, याची माहिती मिळू शकली नाही.

भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची तुलना तालिबानशी केल्याचा आरोप, समाजवादी पक्षाच्या खासदारावर 'देशद्रोहाचा' गुन्हा दाखल

 

यापूर्वी काबूलमधून एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात, काही लोक हवेत असलेल्या विमानातून पडताना दिसले होते. अफगाणिस्तानातील महिला, मुले आणि विशेषत: ज्यांनी गेल्या 20 वर्षांत पाश्चिमात्य(अमेरिका) देशांना मदत केली आहे ते अफगाणिस्तान सोडण्यास घाई करत आहेत. तालिबानची सत्ता आल्यामुळे अफगाणिस्तानात त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तालिबाननं सार्वजनिक माफीची घोषणा केली असली, तरी आधीच्या अनुभवामुळे लोकांचा त्यावर विश्वास नाही.

Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष

अफगाणिस्तावर तालिबानचा कब्जारविवारी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. यासाठी विमान हा एकमात्र पर्याय आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक विमानतळावर येऊन कोणत्याही फ्लाइटमध्ये चढून देशातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. काही लोक निघून जाण्यात यशस्वीही झालेत, पण काही अजूनही त्यांच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन दिवसांपूर्वी एक फोटो समोर ला होता. त्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाने 600 हून अधिक लोक बसलेले दिसत होते. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान