काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:07 IST2019-03-07T16:06:29+5:302019-03-07T16:07:07+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी13 मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, अनेक जण जखमी
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी13 मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अफगाणिस्तामध्ये माजी राष्ट्रपती हामिद करजई यांच्यासमवेत अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मीडियाच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रपती पदाचे उमेदवार अब्दुल लतीफ पेड्रम जखमी झाले आहेत. यासोबतच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार हनीफ अत्तार यांचे आठ बॉडीगार्ड सुद्धा जखमी झाले आहेत.
Pajhwok Afghan News: Firing heard after three blasts in #Kabul PD13 where a big political gathering was underway #Afghanistanpic.twitter.com/JnhUBCGbUY
— ANI (@ANI) March 7, 2019
दरम्यान, घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले असून परिसर खाली करण्यात येत आहे. याशिवाय जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, या हल्ल्यात जवळपास तिघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.