शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis : देशावर कब्जा, दहशतीचं सावट, बंदुकधारी कमांडो, तरीही व्हॉलिबॉल खेळतायंत उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:39 IST

भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानातील शीख खासादार रविवारी भारतात आले. त्यावेळी, अफगाणिस्तानातील परिस्थिती सांगताना त्यांना रडू कोसळलं. तसेच, तेथे सगळं संपत चाललंय, असेही ते म्हणाले. 

मुंबई - अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलमध्ये हल्ला करत तालिबानींनी संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. काबुलवर हल्ला होण्यापूर्वीच राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळाले. अफगाणी सैन्यांनी शरणागती पत्करली त्यामुळे तालिबानींनी २ आठवड्यात अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. त्यानंतर, उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतल्याचं जाहीर केलं. सध्याही अफगाणिस्तानात मोठा तणाव आहे. मात्र, अमरुल्लाह साहेल व्हॉलिबॉल खेळताना दिसून आले आहेत.  

भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे. अफगाणिस्तानातील हिंदू, शिख यांच्यासोबत अफगाणी मदतनीसांना बाहेर काढण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यासोबतच, अफगाणिस्तानी नागरिकही भारतात येत आहेत. अफगाणिस्तानातील शीख खासादार रविवारी भारतात आले. त्यावेळी, अफगाणिस्तानातील परिस्थिती सांगताना त्यांना रडू कोसळलं. तसेच, तेथे सगळं संपत चाललंय, असेही ते म्हणाले.  अफगाणिस्तानमधील या भयंकर परिस्थितीतही उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचा व्हॉलिबॉल खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पंजशीर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या व्हॉलिबॉलच्या ठिकाणी बंदुकधारीही दिसत आहेत. पंजशीर या प्रांतावर तालिबानला कब्जा करता आला नाही. मात्र, ते यावरही ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अमरुल्लाह सालेह हे तालिबानच्या दहशतीला पूर्णपणे समजून आहेत. तरीही, ते बिनधास्तपणे व्हॉलिबॉल खेळत आहेत. त्यामुळेच, लोक सालेह यांना अफगाणिस्तानचा हिरो.. असेही संबोधित आहेत. 

अफगाणिस्तानवर भारताचे लक्ष 

अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर भारतासह जगातील बहुतांश देश लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षातील खासदारांना अफगाणिस्तानशी निगडीत सर्व घटनाक्रमाची माहिती द्यावी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र खात्याला निर्देश दिलेत की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या खासदारांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीची माहिती द्यावी. याबाबत पुढील माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून दिली जाईल असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवाद