शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

Afghanistan crisis: अफगाणिस्तानसाठी भारत सरकारची मोठी घोषणा; ताबडतोब ई-व्हिसा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:09 IST

Afghanistan crisis by Taliban: काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. हे चित्र फार विदारक होते.

अफगाणिस्तानमधील  (Afghanistan) बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारताने व्हिसाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी व्हिसाची नवीन श्रेणी जाहीर केली. यामध्ये अफगानिस्तानातून भारतात येण्यास इच्छुक असलेल्या अफगान नागरिकांना कमीतकमी वेळात व्हिसा दिला जाणार आहे. तालिबानने  (Taliban) कब्जा केल्यानंतर दोन दिवसांतच ही घोषणा करण्यात आली आहे. (home ministry on Tuesday has created a new e-visa category – the e-Emergency X-Miscellaneous visa for Afghan nationals)

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

जे अफगानी नागरिक भारतात येण्यासाठी अर्ज करतील त्यांचा अर्ज कमीत कमी वेळात मार्गी लावण्याचे काम केले जाणार आहे. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगानिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता व्हिसाच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर फक्त अफगानिस्तानसाठी नवीन पर्याय देण्यात आला आहे. यानुसार अफगान नागरिकांना भारतात येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा देण्यात येणार आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या व्हिसाचे नाव ई-आपत्कालीन व्हिसा ठेवण्यात आले आहे. 

Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल

तालिबानच्या भीतीने सोमवारी हजारो अफगानी नागरिक काबुल विमानतळावर जमले होते. त्यांना काहीही करून देश सोडायचा होता. अमेरिकन सैन्याच्या जम्बो विमानात 800 हून अधिक लोक दाटीवाटीने बसले होते. तर काही जण विमानाच्या बाहेरील भागावर बसले होते. यामुळे विमानाने उड्डाण करताच तिघांचा पडून मृत्यू झाला. अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, गोंधळामुळे एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

... म्हणून विमानाच्या मागे धावले अफगानी नागरिक, पसरली होती मोठी अफवाकाबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. अमेरिकन सैन्य दलाचे हे विमाना काबुलमधून अमेरिकेला जाणार होते. येथून उड्डाण केलेल्या अमेरिकेच्या विमानाची क्षमता १३४ प्रवाशांची होती. मात्र, त्यात प्रत्यक्षात ८०० जण होते. अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचे फोटो आणि व्हिडीओ कालच सर्वांनी पाहिले. विमान धावपट्टीवरून निघत असताना शेकडो लोक त्याच्या आसपास धावत होते. विमानाला लटकून प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच प्रयत्नात काही जणांना जीव गेला. आता याच विमानाच्या आतल्या भागातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत