शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Afghanistan: तालिबानला रोखू शकला नाही, तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार? चीनने उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:07 IST

China mocked on America after Afghanistan crisis: चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, असे म्हटले आहे. 

अफगानिस्तान   (Afghanistan) मधील निर्माण झालेल्या परिस्थितीवरून चीनने (China) अमेरिकेवर (America) जोरदार निशाना साधला आहे. तालिबानचे (Taliban) उदाहरण देत चीनने तैवानलाही (Taiwan) धमकी देऊन टाकली आहे. अफगानिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर लगेचच तेथील सरकार पडले आहे. जगाने पाहिले की तालिबानचे लोक तेथील राष्ट्रपती भवनात कसे घुसले आणि अमेरिकेला कसे त्यांच्या अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढावे लागले. यामुळे अमेरिकेच्या विश्वासाला मोठा तडा गेल्याचे चीनने म्हटले आहे. (If not control taliban, then how can save Taiwan; China Target America.)

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, असे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कुत्र्याच्या मृत्यूवेळी शोकसंदेश पाठविणाऱ्या तैवानच्या नेत्या साई इन वेंग यांनी अफगानमधील परिस्थितीवर एक चकार शब्दही काढलेला नाही. अब्ज, खरब डॉलर्स खर्च करून, 20 वर्षे युद्ध करून अमेरिका तालिबानला संपवू शकली नाही. मग तैवानमध्ये आम्हाला काय रोखणार असा सवाल करत एकप्रकारे अमेरिकेची खिल्ली उडविली आहे. 

Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगानिस्तानमध्ये हरवणार'

अफगानिस्तानातील खर्च अमेरिकेला परवडत नव्हता. अफगानिस्तानचे भू-राजनीतिक मूल्य तैवानपेक्षा कमी नाहीय. तिथे अमेरिकेचे तीन कट्टर विरोधी देश आहेत. खुद्द अफगानिस्तानमध्ये अमेरिकाविरोधी विचारांचा गड आहे. तैवानमध्ये अमेरिकेचे कोणतेही सैन्य नाहीय. यामुळे अमेरिकेला तैवानचा काहीच खर्च नाहीय. उलट चीनविरोधात तैवानला शस्त्रे, मांस विकते. फायदा अमेरिकेलाच होतो. यामुळे तैवान आणि चीनमध्ये वैचारिक अंतर असल्याचे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे. 

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

जर चीनने तैवानवर कब्जा केला तर अमेरिकेला अफगानिस्तान, सिरीया, व्हिएतनामपेक्षा जास्त ताकद लावावी लागेल. यामुळे अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाchinaचीन