शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्ष; वर्चस्वासाठी तालिबान-हक्कानी पेटले; गोळीबारात अब्दुल गनी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 10:56 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा करून तीन आठवडे उलटूनही तालिबानला सत्ता स्थापनेत अपयश

काबूल: कोणताही रक्तरंजित संघर्ष न करता अफगाणिस्तान ताब्यात घेण्याचा दावा करणाऱ्या तालिबानला आता मोठा धक्का बसला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये सत्तेतील वाट्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. तालिबानचा सहसंस्थापक अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी गटात गोळीबार झाला. त्यामुळे दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष पाहायला मिळत आहे.

अफगाणिस्तानातील वृत्तपत्र पंजशीर ऑब्जर्व्हरनं दिलेल्या वृत्तानुसार, अनस हक्कानीकडून गोळीबार करण्यात आला. त्यात मुल्ला बरादर जखमी झाला. त्याच्यावर पाकिस्तानात उपचार सुरू आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करून तीन आठवडे उलटले आहेत. अमेरिकन सैन्यानं देशात माघार घेऊन आठवडा होत आला आहे. मात्र अद्याप तालिबानला सरकार स्थापन करता आलेलं नाही. ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश

तालिबान आणि हक्कानी गटात सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष पाहून पाकिस्ताननं आयएसआयमध्ये चीफ लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत असलेल्या फैझ हमीद यांना काबूलला पाठवण्यात आलं. दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी त्यांना काबूलला पाठवलं गेलं आहे. हक्कानी नेटवर्कनं संरक्षण मंत्रीपद मागितलं आहे. पाकिस्तानची आयएसआय हक्कानी नेटवर्कची प्रमुख संरक्षक आहे. अल कायदाशी जवळचे संबंध असल्यानं संयुक्त राष्ट्रानं हक्कानी नेटवर्कला दहशतवादी गटांच्या यादीत ठेवलं आहे.

तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या हालचालीतालिबान, हक्कानी नेटवर्क यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी फैझ हमीद काबूलला रवाना झाले आहेत. मुल्ला अब्दुल गनी बरादर, क्वेटा शूराचा मुल्ला याकूब, मुल्ला उमरचा मोठा मुलगा आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात असलेले मतभेद कमी करण्याची जबाबजारी हमीद यांना देण्यात आली आहे. तालिबानच्या गटांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच सरकार स्थापनेला उशीर होत आहे. मुल्ला बरादर सरकारचं नेतृत्त्व करणार असल्याचं याआधी सांगितलं गेलं होतं. मात्र आता मतभेदांमुळे सरकार स्थापनेस विलंब होत आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान