Afghanistan: ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:18 AM2021-09-05T08:18:26+5:302021-09-05T08:22:06+5:30

amrullah saleh: अफगाणिस्तानचा कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित केलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी काबूलवर तालिबानच्या कब्ज्यावेळची धक्कादायक कहानी सांगितली आहे.

Afghanistan: ... then shoot me; amrullah Saleh orders bodyguards when Kabul fall to Taliban | Afghanistan: ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश

Afghanistan: ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश

Next

काबूल: अफगाणिस्तानवर (Afghanistan) सध्या तालिबानने (Taliban) कब्जा मिळविला आहे. दररोज तिथे तालिबान कसा धुडगुस घालते याचे फोटो, व्हिडीओ जगभराची चिंता वाढवत आहेत. या साऱ्या काळात अफगाणिस्तानचा कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित केलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी काबूलवर तालिबानच्या कब्ज्यावेळची धक्कादायक कहानी सांगितली आहे. त्यांनी तालिबानच्या कब्ज्य़ानंतर त्यांची पत्नी आणि मुलीचे फोटो जाळून टाकले. तसेच आपल्या बॉडीगार्डला सांगितले की जर मी जखमी झालो तर मला गोळी मारून ठार करावे. (Amrullah Saleh denies rumours of losing valley to Taliban, fleeing Afghanistan)

अमरुल्लाह सालेहने सांगितले की, काबूलवर कब्जा करण्याच्या एक रात्र आधी तुरुंगात उठाव झाला होता. सालेह यांनादेखील याबाबत सांगण्यात आले होते. त्यांनी तालिबानशी संबंध नसलेल्या कैद्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता, त्यांनी संरक्षण मंत्री, अंतर्गत प्रकरण मंत्री आणि त्यांचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील झाला नाही. पोलिस प्रमुखांनी सांगितले की, आम्ही फक्त एक तासच मोर्चा सांभाळू शकू. 

तो तास खूप वाईट आणि उदास होता. त्या तासाभरात काबूल शहरात एकही सैन्याचा जवान दिसला नाही. मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना आपल्याला काहीतरी करावे लागेल, असा मेसेज पाठविला होता. मात्र, त्यांच्याकडूनही काहीच प्रतिक्रिया आली नाही. 15 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजता काबूलमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तालिबानने कब्जा केला, तेव्हा सालेह यांनी पंजशीरच्या अहमद मसूदला मेसेज पाठविला. 

पंजशीर घाटीवर तालिबानने कब्जा केल्याचे वृत्त फेटाळताना सालेह यांनी सांगितले की, मी माझी पत्नी आणि मुलीचे फोटो जाळले. माझा कॉम्प्युटर आणि काही साहित्य एकत्र केले. जर तालिबानच्या हल्ल्यात मी जखमी झालो तर मला गोळी मार असे आदेश मी बॉडीगार्डला दिले होते. 

अमरुल्लाह सालेहने व्हिडीओ जारी केला...
सालेह यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून म्हटले की, मी कुठेही पळून गेलेलो नाही. आताही मी पंजशीरमध्ये लोकांसोबत आहे. तालिबानविरोधात बैठका सुरु आहेत. आम्ही कठीण परिस्थीतीत आहोत, यात शंका नाही. आम्ही तालिबानच्या हल्ल्याला तोंड देत आहोत. 

Web Title: Afghanistan: ... then shoot me; amrullah Saleh orders bodyguards when Kabul fall to Taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.