अफगाणिस्तान: काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला, 15 कॅडेट्सचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 18:32 IST2017-10-21T18:32:23+5:302017-10-21T18:32:36+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तान: काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला, 15 कॅडेट्सचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काबुलमधील पीडी 5 येथील मार्शल फहीम मिलिट्री अकॅडमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्फोट झाला. मिलिट्रीचे प्रवक्ते दौलत वजीरी यांनी हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
15 cadets killed and four wounded in attack at Marshal Fahim Military Academy in Kabul: #Afghanistan media
— ANI (@ANI) October 21, 2017