शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 08:36 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि नाजूक असल्याचं म्हटलं आहे. एक शेजारी देश आणि देशातील नागरिकांसोबत मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे अफगाणिस्तानातील सद्यस्थितीनं आम्ही चिंतेत आहोत, असं भारतानं म्हटलं आहे. (Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting)

"अफगाणिस्तानातील चिमुकल्यांची स्वप्न साकार करणं आणि अल्पसख्यांकांच्या अधिकारांची सुरक्षा आपल्याला करावी लागेल. देशातील सर्व वर्गांचा सन्मान होईल अशी सर्वसमावेशक व्यवस्था प्रस्थापित करण्याचं आवाहन आम्ही अफगाणिस्तानला करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्वीकारार्हता आणि वैधता प्राप्त होईल असं असं सरकारर अफगाणिस्तानात स्थापन व्हावं. यासाठी दहशतवादाविरोधात जी वचनं दिली गेली आहेत. त्याचा सन्मान आणि पालन केलं जाईल याची काळजी अफगाणिस्तानला घ्यावी लागेल", असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानातील नागरिक कोणत्याही अडथळ्याविना परदेश दौरा करू शकतील असं तालिबाननं वचन दिलं आहे. त्याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असंही तिरुमूर्ती म्हणाले. 

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नयेगेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात नाट्यमय घडामोडी घडत असून सारं जग याचं साक्षीदार आहे. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन तीनवेळा बैठक झाली. यात आम्ही काही चिंतेचे मुद्दे उपस्थित केले. विशेषत: दहशतदवादाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाया आणि ट्रेनिंगसाठी होणार नाही अशी ग्वाही तालिबाननं दिली आहे. यासोबतच जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही किंवा त्यांना अर्थपुरवठा देखील केला जाणार नाही असं आश्वासन तालिबान्यांनी दिलं आहे. याचं पालन केलं जाईल अशी आशा आम्हाला आहे, असं टीएस तिरुमूर्ती म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ