शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

"उशीर होण्यापूर्वी आम्हाला वाचवा...;" अफगाणिस्तानातील हिंदूं-शिख समुदायाचं जगाला भावनिक आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 09:36 IST

सध्या आम्ही काबुलमध्ये राहत आहोत आणि सुरक्षित आहोत, पण आम्ही किती काळ सुरक्षित राहणार हे कुणालाही माहीत नाही.

नवी दिल्ली - उशीर होण्यापूर्वी आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढा, असे कळकळीचे आवाहन युद्धजन्य परिस्थितीत सापडलेल्या अफगाणिस्तानातील (Afghanistan) हिंदू-शिख समुदायांने आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काबूलमधील गुरुद्वारा कर्ता परवानचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांनी म्हटले आहे, की सातत्याने असलेल्या तालिबानच्या भीतीमुळे सुमारे दीडशे हिंदू-शिख काबुलमध्ये राहत होते. सध्या आम्ही काबुलमध्ये राहत आहोत आणि सुरक्षित आहोत, पण आम्ही किती काळ सुरक्षित राहणार हे कुणालाही माहीत नाही. याच बरोबर, येथून जाण्याचीही आपल्याला भीती वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Afghan hindus sikhs urges international community to help)

गुरनाम सिंग म्हणाले, काबुलमधील पाचपैकी चार गुरुद्वारा बंद झाले आहेत. गुरू ग्रंथ साहीबचा प्रकाश गुरुद्वारा कर्ता पारवानमध्येच होत आहे. तसेच, उरलेल्या हिंदू-शिख लोकांना आर्थिक सुरक्षितता नसल्याने भारतात जाण्याची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

Taliban War:खुद्द अमेरिका हैराण! एकही युद्ध लढले नाहीत, तरीही जिंकण्याच्या तयारीत तालिबान

कॅनडाकडे मदतीची हाक - दरम्यान, मनमीतसिंग भुल्लर फाऊंडेशन, खालसा अँड कॅनडा आणि कॅनडाच्या जागतिक शीख संघटनेने (डब्ल्यूएसओ अफगाणिस्तानातील कमकुवत हिंदू-शिख अल्पसंख्यकांसाठी विशेष कार्यक्रम आखण्याचे आवाहन केले आहे. अफगानिस्तानातील अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांचा परत फिरण्याचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे आणि युद्धग्रस्त अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अराजकता आणि हिंसाचार वाढत आहे.

तालिबानी दहशतवाद्यांचा राजधानी काबुलच्या दिशेने कूच - अफगाणिस्तानमधून अमेरिकेने 20 वर्षांपासून तळ ठोकून असेलेले सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर तालिबानने पुन्हा कब्जा करायला सुरुवात केली आहे. कंदहार सारख्या शहरांना ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवादी राजधानी काबुलच्या दिशेने कूच करू लागले आहेत. 

तालिबानच्या ताब्यात महत्वाची पोस्ट -अफगाणिस्तानचे अशरफ गनी सरकार सध्या काहीच पोस्टवर आपला ताबा ठेवून आहेत. इराण, पाकिस्तानच्या सीमेवरून 2.9 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तालिबानच्या ताब्यात यापैकी 0.9 अब्ज डॉलरचा व्यापार होणारी पोस्ट गेली आहेत. उरलेल्या पोस्टवर तालिबान कब्जा करण्यासाठी रणनिती आखत आहे. अमेरिकेला या तालिबानच्या खतरनाक प्लॅनची चिंता वाटू लागली आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानHinduहिंदूsikhशीखCanadaकॅनडाTerrorismदहशतवाद