अभिनेते आमिर खान यांनी घेतली टर्कीच्या फर्स्ट लेडी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:17 IST2020-08-19T05:17:02+5:302020-08-19T05:17:19+5:30

‘जगभर ख्यातकीर्त व भारतीय अभिनेते, आमिर खान यांना इस्तंबूलमध्ये भेटण्याची मोठी संधी मला मिळाली.’’

Actor Aamir Khan meets Turkey's First Lady | अभिनेते आमिर खान यांनी घेतली टर्कीच्या फर्स्ट लेडी यांची भेट

अभिनेते आमिर खान यांनी घेतली टर्कीच्या फर्स्ट लेडी यांची भेट

इस्तंबूल : चित्रपट अभिनेते आमिर खान यांनी टर्कीच्या फर्स्ट लेडी एमाईन एर्डोगॅन यांची येथे शनिवारी भेट घेतली. या भेटीनंतर खान यांना समाजमाध्यमांतून युजर्सनी ट्रोल केले. खान हे सध्या त्यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले आहेत.
एमाईन एर्डोगॅन यांनी खान यांचे अध्यक्षांच्या निवासस्थानी स्वागत केले. १५ आॅगस्ट रोजी भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन होता. एमाईन एर्डोगॅन यांनी या भेटीचे टष्ट्वीटही केले. ‘‘जगभर ख्यातकीर्त व भारतीय अभिनेते, आमिर खान यांना इस्तंबूलमध्ये भेटण्याची मोठी संधी मला मिळाली.’’
खान यांनी त्यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण टर्कीच्या वेगवेगळ््या भागांत करण्याचे ठरवल्याचे समजल्यावर मला आनंद झाला, असेही त्यांनी लिहिले. खान यांनी ते ज्या सामाजिक जबाबदाऱ्यांच्या प्रकल्पांशी संबंधित आहेत त्याची एर्डोगॅन यांना माहिती दिली. चित्रपटात खान जे सामाजिक प्रश्न मांडत आहेत त्याबद्दल एर्डोगॅन यांनी त्यांचे अभिनंदन केले.
>कंगना रानौत हिची टीका
अभिनेत्री कंगना रानौत हिने आमिर खान यांच्यावर नुकतीच टिष्ट्वटरवर टीका करताना ‘तुम्ही तुमच्या मुलांना फक्त इस्लामचे अनुसरण करण्यास का सांगता’ असा प्रश्न विचारला. रानौत हिच्या टीमने आमिर खान यांची एक जुनी मुलाखतही लिंकसह दिली. त्यात खान यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य खुले करून सांगितले आणि त्यांची पत्नी ही हिंदू असली तरी त्यांची मुले ही फक्त इस्लामचेच अनुसरण करतील,’ असे म्हटले.

Web Title: Actor Aamir Khan meets Turkey's First Lady