Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठी दुर्घटना; चालता चालता पायऱ्यांवरून घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:09 IST2022-12-03T14:08:08+5:302022-12-03T14:09:00+5:30
व्लादिमीर पुतीन त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या पायऱ्या उतरत असताना घसरले आणि खाली पडले.

Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठी दुर्घटना; चालता चालता पायऱ्यांवरून घसरले
युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहेत. पुतीन यांना कोणता तरी आजार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद देखील सोडतील असेही सांगितले जात आहे. नुकतेच डेली मेलने पुतीन त्यांच्या निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून घसरून पडल्याचे वृत्त दिल्याने खळबळ उडाली आहे.
व्लादिमीर पुतीन त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या पायऱ्या उतरत असताना घसरले आणि खाली पडले. एका टेलिग्राम चॅनलने हा दावा केला आहे. पुतीन यांचे वय ७० वर्षे आहे. ते बुधवारी सायंकाळी घराच्या पायऱ्यांवरून खाली पडले आहेत. पुतीन पाच पायऱ्या खाली कोसळले, सावरत नाहीत तोच त्यांचा पुन्हा तोल जाऊन ते आणखी दोन पायऱ्या खाली कोसळले, असा दावा जनरल एसवीआर नावाच्या टेलिग्राम चॅनलने केला आहे.
जनरल एसव्हीआरने युद्ध सुरू झाल्यापासून पुतिन यांच्या आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. आताही पुतीन कोसळताच डॉक्टरांची टीम त्यांच्याकडे लगेचच पोहोचली. परंतू तातडीने त्यांच्यावर उपचार करू शकली नाही, असा दावा करण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांसमोर ही घटना घडल्याचा दावा चॅनलने केला आहे. पुतीन कोसळत असल्याचे पाहून ते धावले आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. तीन गार्डनी पुतीन यांना जवळच्या सोफ्यावर नेऊन बसविले. तसेच डॉक्टरांना निवासस्थानी बोलावले. रिपोर्टनुसार, पुतीन यांना 'ऑन्कॉलॉजी'चा त्रास झाल्यामुळे हे घडले.