"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:29 IST2026-04-07T18:27:35+5:302026-04-07T18:29:39+5:30
हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार, खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल असं ट्रम्प यांनी म्हटलं.

"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
वॉशिंग्टन - अमेरिका इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. त्यात अमेरिकेने २ दिवसांपूर्वी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. ज्याची मुदत आता संपत आली आहे. त्यातच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी धमकी दिली आहे. आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल. जी पुन्हा आणली जाऊ शकत नाही. मला असं करायचं नव्हते परंतु कदाचित हेच होईल असं ट्रम्प यांनी सांगत इराणला धमकी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 'Truth Social' वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय की, आता इराणमधील सत्ता बदलली आहे. आता तिथे आधीपेक्षा कमी कट्टरपंथी आणि स्मार्ट लोक आलेत. ते काही क्रांतीकारी पाऊल उचलतील का हे माहिती नाही. आज रात्री सगळं कळेल. हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार, खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल. ईश्वर महान आहे, त्यांची इराणी जनतेवरील कृपा कायम राहील असं ट्रम्प यांनी म्हटलं.
US President Donald Trump posts on Truth Social, "A whole civilization will die tonight, never to be brought back again. I don’t want that to happen, but it probably will. However, now that we have Complete and Total Regime Change, where different, smarter, and less radicalized… pic.twitter.com/jPxOxy9pRw
— ANI (@ANI) April 7, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अशावेळी समोर आले आहे जेव्हा एक दिवस आधी ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलट यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती दिली. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ खुला करून डील करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. जी आता काही तासांनी संपेल. सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती आणि त्या वेळेत सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र जग या संघर्षाच्या निकालाची वाट पाहत असताना ट्रम्प यांनी तणाव कमी केला आणि मुदतवाढ दिली. आतापर्यंत ट्रम्प यांनी तीन वेळा मुदतवाढ दिली असून ही नवीन मुदत ८ एप्रिल रोजी संपत आहे. पहिला इशारा ४८ तासांचा होता, जो नंतर पाच दिवसांनी आणि त्यानंतर आणखी १० दिवसांनी वाढवण्यात आला. अशाप्रकारे मूळ ४८ तासांची मुदत आता एकूण ४०८ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू
दरम्यान, ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला काही तास शिल्लक असताना इस्रायल अमेरिकेने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. त्यात इराणी सरकारने ट्रेनची सेवा थांबवली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात शहरातील अनेक मोठे पूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इराणमधील तबरेज जांजन हायवेवरील एक ब्रिज उडवण्यात आला आहे. त्याशिवाय काशान रेल्वे पुलावरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात इस्रायलने दिलेल्या ट्रेन हल्ल्याच्या इशाऱ्यामुळे इराणमधील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे.