मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:06 IST2022-11-10T13:06:23+5:302022-11-10T13:06:33+5:30
मालदीवमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राजधानी माले येथील परदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना आग लागली, यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला.

मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश
मालदीवमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राजधानी माले येथील परदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना आग लागली, यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये ९ भारतीय कामगारांचा समावेश आहे. या आगीच्या घटनेत काही जण जखमीही झाले आहेत.
युद्धासाठी सज्ज राहा! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश
आगीतील नुकसान झालेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून १० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीच्या तळमजल्यावर गॅरेज असल्याचे सांगण्यात आले आणि त्यात आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात आली आणि बघता बघता आग वाढली, आणि सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला.