एका उंदराने पुतिन यांचा पाठलाग केला होता, रशियाच्या अध्यक्षांनी सांगितला किस्सा; युक्रेन युद्धाचा संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:43 IST2025-05-15T11:28:17+5:302025-05-15T11:43:36+5:30
युक्रेन आणि रशियामध्ये आता युद्धविरामच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दरम्यान आता पुतिन यांचा २५ वर्षापूर्वीची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

एका उंदराने पुतिन यांचा पाठलाग केला होता, रशियाच्या अध्यक्षांनी सांगितला किस्सा; युक्रेन युद्धाचा संबंध?
मागील काही वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. पण, अजूनही यश मिळालेलं नाही. दरम्यान, आता युद्ध थांबवण्यासाठी तुर्कीने मध्यस्थी करण्याची ऑफर दिली, झेलेन्स्कीना आमंत्रण दिले, ट्रम्पने रस दाखवला पण, शेवटच्या क्षणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोघांनीही माघार घेतली. आता पुतिन यांच्याऐवजी फक्त रशियन शिष्टमंडळच चर्चेत सहभागी होईल. दरम्यान, पुतिन यांच्या २५ वर्षापूर्वीच्या एका जुन्या मुलाखतीची चर्चा सुरू आहे.
यामध्ये त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला होता. यामुळे कदाचित त्यांच्या युद्ध धोरणाचा पाया रचला असेल. पुतिन म्हणाले की, त्यांच्या बालपणी एकदा त्यांनी एका उंदराला कोपऱ्यात पकडले होते, पण जेव्हा उंदराने मागे वळून त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला.
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बालपणीचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो किस्सा फक्त त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करत नाही तर युक्रेन युद्धातील त्यांच्या वृत्तीची झलक देखील देत आहे.
पुतिन यांना उंदराने पळवले होते
पुतिन यांनी वर्ष २००० मध्ये ही मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, बालपणी ते लेनिनग्राड येथील एका जीर्ण इमारतीत राहत होते. ते आणि त्यांचे मित्र तिथल्या अरुंद कॉरिडॉरमध्ये काठ्यांनी उंदरांना हाकलून लावायचे. एके दिवशी, त्यांना एका मोठ्या उंदीरला कोपऱ्यात अडकलेले दिसले. पण नंतर मग उंदीर वळला आणि पुतिन यांच्यावर झडप घालायला लागला, यामुळे पुतिन घाबरून पळून गेले. "कोपऱ्यात अडकलेला माणूस किती दूर जाऊ शकतो हे मला पहिल्यांदाच समजले," पुतिन म्हणाले. या घटनेचा त्यांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम झाला.
युक्रेन युद्धाशी काय संबंध?
पुतिन हे स्वतःला "कोपऱ्यात अडकलेला उंदीर" मानतात, जेव्हा दुसरा पर्याय दिसत नाही तेव्हा तो प्रत्युत्तर देतो. हीच वृत्ती युक्रेन युद्धातही दिसून येते, तिथे पुतिन यांनी नाटोचा विस्तार आणि पाश्चात्य दबाव हे स्वतःसाठी थेट धोका मानून लष्करी कारवाईचा मार्ग निवडला.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच, पुतिन यांच्या रणनीतीमध्ये आक्रमकता, हट्टीपणा आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष यांचा समावेश आहे.