इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:41 IST2025-12-23T13:24:27+5:302025-12-23T13:41:35+5:30
इराणमधील तफ्तान ज्वालामुखीचा ७ लाख वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. उपग्रह डेटावरून याबाबत माहिती समोर आली आहे. शिखरावरील जमीन ९ सेमी उंचावली आहे, हे वायू जमा होण्याचे संकेत देते. स्थानिकांना गंधकाचा वास येत आहे.

इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
इराण एक नवीन संकट येणार आहे. आग्नेय इराणमधील माउंट तफ्तान हा ज्वालामुखी पुन्हा एकदा ७ लाख वर्षांनंतर सक्रिय झाला आहे. मागील ७ लाख वर्षांपासून हा ज्वालामुखी निष्क्रिय होता. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन अभ्यासातून ही बाबत उघड झाली आहे. ज्वालामुखीच्या शिखरावर जमीन वर येत आहे, यामुळे वाढता दाब दिसून येतो. हा निष्कर्ष युरोपियन स्पेस एजन्सीच्या सेंटिनेल-१ उपग्रहातील डेटावर आधारित आहे.
जुलै २०२३ ते मे २०२४ दरम्यान, तफ्तानच्या शिखरावरची जमीन सुमारे ९ सेंटीमीटर वाढली. ही वाढ हळूहळू झाली आणि अद्याप कमी झालेली नाही. शास्त्रज्ञांनी इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक अपर्चर रडार वापरला, हा जमिनीच्या अगदी लहान हालचाली देखील ओळखतो.
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
एका नवीन "कॉमन-मोड फिल्टरिंग" पद्धतीमुळे वातावरणातील आवाज काढून टाकून डेटा आणखी क्लिअर मिळत आहे. यामुळे उत्थान दिसून आले. हा दाब स्रोत शिखराच्या फक्त ४९० ते ६३० मीटर खाली आहे.
कारण काय आहे?
ही वाढ ज्वालामुखी वायूंमुळे किंवा गरम पाण्यामुळे शिखर फुग्यासारखे बनत आहे. खोलवर मॅग्माची थोडीशी हालचाल देखील असू शकते,असा विश्वास शास्त्रज्ञांचा आहे.
स्थानिक चिन्हे- २०२३ पासून, परिसरातील रहिवासी तीव्र सल्फर वास आणि वायू उत्सर्जनाच्या तक्रारी करत आहेत.
दररोज अंदाजे २० टन सल्फर डायऑक्साइड वायू बाहेर पडतो, असा अभ्यासांचा अंदाज आहे.
इतर कारणे: पाऊस किंवा भूकंप होण्याची शक्यता नाकारली जात होती कारण त्या काळात कोणतेही मोठे भूकंप झाले नव्हते आणि कमी पाऊस पडला होता.
ज्वालामुखीची माहिती
तफ्तान हा इराणमधील एक स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे, हा पाकिस्तानच्या सीमेजवळील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात आहे. त्याची उंची अंदाजे ३,९४० मीटर (१३,००० फूट) आहे. ते मकरन सबडक्शन झोनमध्ये आहे, तिथे अरबी प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली उपसत आहे.