शेजारी देशानेच अमेरिकेला ललकारलं! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता कोणाशी भिडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:46 IST2025-01-27T11:44:21+5:302025-01-27T11:46:54+5:30
Immigration Policy And Tariff War: सत्तेत घरवापसी करताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यावरून शेजारील देशांसोबत संघर्ष सुरू झाला आहे.

शेजारी देशानेच अमेरिकेला ललकारलं! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता कोणाशी भिडले?
Donald Trump News: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांच्या विषयाला हात घातला. अवैधपणे राहत असलेल्या नागरिकांना पकडून परत पाठवण्याचे काम सुरू झाले. पण, यावरूनच अमेरिकेचा कोलंबियासोबत संघर्ष सुरू झाला आहे. कोलंबियाने अवैध नागरिकांना घेऊन येणाऱ्या विमान परवानगी नाकारली. त्यामुळे वाद आणखी वाढला आहे. ट्रम्प यांनी कोलंबियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावला असून, तो पुढील आठवड्यात ५० टक्के इतका करण्याचा इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवैध नागरिकांना परत घेण्यास कोलंबियाने नकार दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. कोलंबिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे थेट परिणाम व्यापारावर झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोलंबियाचे जशास तसे उत्तर
अवैध प्रवाशांना घेऊन येणारी विमाने देशात येऊ देण्यास कोलंबियाने विरोध केला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पुढील आठवड्यापर्यंत पुर्नविचार न केल्यास आयात कर ५० टक्के करण्याचा इशारा दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कोलंबियानेही तसेच उत्तर दिले आहे. कोलंबियाने अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर आकारण्याची घोषणा केली आहे. कोलंबिया वॉशिंग्टनपासून जवळ असणाऱ्या मित्र देशांपैकी एक आहे. त्यामुळे ट्रम्प आता पुढे काय निर्णय घेणार याची प्रतिक्षा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे वाद
संघराज्य अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना पकडून परत त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांचा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावा पेट्रो यांनी कडाडून विरोध केला.
"अमेरिका कोलंबियातील अनिवासी लोकांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊ शकत नाही. मी कोलंबीयन प्रवाशांना घेऊन येणाऱ्या अमेरिकेच्या विमानांना कोलंबियात प्रवेश करू देण्यास माझा नकार आहे", असे पेट्रो म्हणाले.