बांगलादेशमध्ये काली मंदिरात आरती सुरू असतानाच भीषण स्फोट; मुखवटाधारी इसमानं ठेवली बॅग, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 18:47 IST2026-03-08T18:42:15+5:302026-03-08T18:47:38+5:30

Bangladesh Mandir Blast: बांगलादेशमधील कोमिला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी येथील काली मंदिरात भाविक पूज करत असताना एक मुखवटा घातलेला इसम मंदिरात आला. तसेच त्यानेन तिथे एक स्फोटके असलेली बॅग ठेवली. काही वेळाने या बॅगेमधील स्फोटकांचा स्फोट होऊन मंदिर परिसर हादरला.

A massive explosion occurred while aarti was going on at the Kali temple in Bangladesh; a masked man left a bag, then... | बांगलादेशमध्ये काली मंदिरात आरती सुरू असतानाच भीषण स्फोट; मुखवटाधारी इसमानं ठेवली बॅग, त्यानंतर...

बांगलादेशमध्ये काली मंदिरात आरती सुरू असतानाच भीषण स्फोट; मुखवटाधारी इसमानं ठेवली बॅग, त्यानंतर...

बांगलादेशमध्ये निवडणुका होऊन नवे सरकार स्थापन झाले असले तरी हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या प्रमाणात कुठलीही घट झालेली नाही. यादरम्यान बांगलादेशमधील कोमिला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी येथील काली मंदिरात भाविक पूज करत असताना एक मुखवटा घातलेला इसम मंदिरात आला. तसेच त्यानेन तिथे एक स्फोटके असलेली बॅग ठेवली. काही वेळाने या बॅगेमधील स्फोटकांचा स्फोट होऊन मंदिर परिसर हादरला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी ६ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास मंदिरामध्ये साप्ताहिक शनी पूजा सुरू होती. त्यावेळी एक मुखवता घातलेला इसम तिथे आला. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याने ही भाग मंदिराच्या आवारात ठेवली आणि तो तिथून पसार झाला. त्यानंतर काही वेळातच मंदिरात मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये मंदिरातील पुजारी केशव चक्रवर्ती हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, मंदिरात स्फोटके ठेवणाऱ्या हल्लेखोरांनी मंदिरात बॉम्ब ठेवून पळून जात असताना जवळच्या बौद्ध मंदिरावर आणि एका खाजगी कार्यालयावर क्रूड बॉम्ब फेकले. त्यात अब्दुल बारेक आणि जिहाद नावाचे दोघेजण जखमी झाले. 
 

Web Title : बांग्लादेश के काली मंदिर में आरती के दौरान विस्फोट; नकाबपोश ने रखा बैग

Web Summary : बांग्लादेश के एक काली मंदिर में प्रार्थना के दौरान एक नकाबपोश ने बम रखा। विस्फोट में पुजारी और पास के अन्य लोग घायल हो गए।

Web Title : Blast at Bangladesh Kali Temple During Aarti; Masked Man Planted Bag

Web Summary : A masked man planted a bomb in a Bangladesh Kali temple during prayers. The explosion injured the priest and others nearby.