शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नराधमाने मुलांसमोर केली पत्नीची हत्या; मृतदेह टाकला उकळलेल्या पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:31 IST

पाकिस्तानमधील कराची येथील एका नराधमाने आपल्या सहा मुलांसमोर पत्नीची हत्या करून मृतदेह उकळलेल्या पाण्यात टाकला.

कराची: पाकिस्तानातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका व्यक्तीने आपल्या सहा मुलांसमोर कथितपणे आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह उकळलेल्या पाण्यात टाकला आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कराची शहरातील गुलशन-ए-एकबाल भागातील एका खासगी शाळेच्या स्वयंपाकगृहामधून नर्गिस नावाच्या एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांच्या माहितीनुसार, बाजौर एजन्सीचा रहिवाशी असलेला पती आशिक हा एका शाळेत वॉचमेन म्हणून कार्यरत होता. जवळपास आठ ते नऊ बंद असलेल्या शाळेमध्येच तो राहत होता. 

उशीने गळा दाबून केली हत्या  जिल्ह्याचे माजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुर रहीम शेराझी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटले की, सध्या अन्य तीन मुलांचा ताबा पोलिसांकडे आहे. शेराझींनी सांगितले की, या घटनेनंतर त्या लहान मुलांना धक्का बसला असून ती खूप घाबरली आहेत. मुलांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीची उशीने गळा दाबून हत्या केली. 

अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा एक पाय शरिरापासून वेगळा झाला आहे. या घटनेमागे नेमकं कोणतं कारण आहे हे अद्याप समोर आलं नाही. मात्र आरोपीने पत्नीला अवैध संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते आणि असे करण्यास पत्नीने नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली आहे, असे बोलले जात आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू