इस्लामाबाद: ज्या पाकिस्तानमध्ये हिंदू आणि शिखांच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, त्याच पाकिस्तानमध्ये एका भारतीय वंशाच्या शिख पाहुण्याचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले आहे. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानने रेड कार्पेट अंथरण्यासोबतच पारंपारिक ढोल-ताशे आणि पायात घुंगरू बांधलेल्या घोड्यांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
अजय बंगा यांचा हा दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. ते आपल्या पालकांच्या मूळ गावी, म्हणजेच खुशब येथील पूर्वजांची जमीन पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाकिस्तानचे माजी प्रांतीय मंत्री आसिफ भाई आणि स्थानिक प्रशासनाने त्यांचे जंगी स्वागत केले. बंगा यांनी यावेळी गुरुद्वारा सिंह सभा येथे जाऊन दर्शनही घेतले.
पाकिस्तानच्या या 'अतिथ्य' प्रेमामागे काय आहे कारण? अजय बंगा यांचे स्वागत करताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याला 'शांती आणि सांस्कृतिक सौहार्दाचा संदेश' म्हटले असले तरी, त्यामागे आर्थिक गणिते दडलेली आहेत. पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत असून, त्यांचे परकीय चलन साठे आटले आहेत. अशा परिस्थितीत वर्ल्ड बँकेकडून आर्थिक मदत आणि कर्ज मिळवण्यासाठी बंगा यांना खुश करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
कोण आहेत अजय बंगा? १९५९ मध्ये महाराष्ट्रात जन्मलेले अजय बंगा हे जागतिक अर्थकारणातील एक दिग्गज नाव आहे. जून २०२३ मध्ये त्यांची वर्ल्ड बँकेच्या १४ व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझासाठी जाहीर केलेल्या 'बोर्ड ऑफ पीस'मध्येही त्यांचा समावेश आहे.
Web Summary : Pakistan warmly welcomed World Bank President Ajay Banga, an Indian-origin Sikh, with traditional celebrations during his visit to his ancestral village. Facing economic challenges, Pakistan hopes to secure financial aid from the World Bank by honoring Banga.
Web Summary : पाकिस्तान ने भारतीय मूल के विश्व बैंक के अध्यक्ष अजय बंगा का उनके पैतृक गांव की यात्रा के दौरान पारंपरिक उत्सवों के साथ गर्मजोशी से स्वागत किया। आर्थिक चुनौतियों का सामना कर रहे पाकिस्तान को बंगा को सम्मानित करके विश्व बैंक से वित्तीय सहायता मिलने की उम्मीद है।