शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा तब्बल ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:12 IST

Steve Jobs Letter on Kumbh Mela: ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल ४.३२ कोटी रुपयांना लिलाव झाला आहे.

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असलेल्या महाकुंभ मेळ्याला प्रयागराज येथे सुरुवात झाली आहे. आतापर्यंत येथील त्रिवेणी संगमामध्ये ५ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं असून, २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये सुमारे ४० कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल ४.३२ कोटी रुपयांना लिलाव झाला आहे.

स्टीव्ह जॉब्स यांनी हे पत्र मित्र टिम ब्राऊन यांना लिहिलं होतं. यामध्ये कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आयोजनाप्रति आपली ओढ स्टीव्ह जॉब्स यांनी प्रदर्शित केली होती. तसेच कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. हे पत्र समोर आल्यानंतर आता लॉरेन पॉवेल ह्या त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाकुंभमेळ्यामध्ये आल्या आहेत, असे मानले जात आहे.

स्टीव्ह जॉब्स यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये आध्यात्मिकआणि काव्यात्मक बाजूची एक दुर्मीळ झलक दिसते. जॉब्स यांचं लिलाव झालेलं हे पहिलं खाजगी पत्र आहे. याची किंमत ५ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ४.३२ कोटी रुपये) एवढी आहे. स्टीव जॉब्स यांनी त्यांच्या १९ वाढदिवसावेळी हे पत्र बालपणीचे मित्र टीम ब्राऊन यांना संबोधित करताना लिहिलं होतं.

स्टीव जॉब्स यांनी हे पत्र ब्राउन यांनी हिलेलेल्या पत्राचं उत्तर म्हणून लिहिलं असावं, असं या पत्रातील उल्लेखामधून दिसून येतं. त्यात स्टीव्ह जॉब्स हे चिंतीत दिसत आहेत. तसेच मी अनेकदा रडलोय, असं सांगताना दिसत आहेत. या पत्रात स्टीव जॉब्स लिहितात की, मी कुंभमेळ्यासाठी भारतात जाऊ इच्छितो. तो एप्रिल महिन्यात सुरू होतो. मी मार्च महिन्यामध्ये कुठल्याही वेळी जाईन. मात्र याबाबत मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही, असं ते लिहितात. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्यावर हिंदू धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसत असून, त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी शांती, स्टीव्ह जॉब्स असं लिहिलेलं दिसत आहे.  

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्सKumbh Melaकुंभ मेळाHinduismहिंदुइझम