कोलंबियामध्ये हवाई दलाचे एक विमान कोसळले आहे. या विमानात एकूण ११० सैनिक होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. देशाच्या दक्षिण भागात लॉकहीड मार्टिन (LMT.N) कंपनीचे हर्क्युलस सी-१३० विमान कोसळले आहे अशी माहिती कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
स्थानिक वृत्तसंस्था 'ब्लू रेडिओ'ने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी सांगितले की, पेरूच्या सीमेला लागून असलेल्या कोलंबियाच्या दक्षिण ॲमेझॉन प्रदेशातील प्युएर्तो लेगुइझामो येथून उड्डाण करताना विमानात सशस्त्र दलाचे सैनिक होते. या अपघातातील मृतांची नेमकी संख्या आणि अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. परंतु विमानात ११० सैनिक होते आणि हा अपघात एका शहरी केंद्रापासून केवळ ३ किलोमीटर (२ मैल) अंतरावर झाला आहे. या अपघातात ९० सैनिकांचा मृत्यू तर २० गंभीर जखमी असल्याचं बोलले जाते. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याआधी फेब्रुवारीच्या अखेरीस बोलिव्हियन हवाई दलाचे एक हर्क्युलस सी-१३० विमान राजधानी ला पाझजवळील दाट लोकवस्तीच्या आल्टो शहरात कोसळले होते. या भीषण अपघातात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. या विमानातील माल शहरभर विखुरला गेला, ज्यामुळे नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला.
सी-१३० चे वैशिष्ट्य काय आहे?
सी-१३० हे विमान अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनद्वारे तयार केले जाते. हे विमान केवळ मोठेच नाही तर संरक्षणाच्या गरजांसाठी अत्यंत योग्य मानले जाते. ते ३० मीटर लांब आणि १२ मीटर उंच आहे. एकूण १९ टन माल वाहून नेण्यास हे विमान सक्षम आहे. हे विमान ताशी ६४३ किलोमीटर वेगाने उडू शकते आणि त्याची मारक क्षमता ३,३३४ किलोमीटर आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानातही उड्डाण करण्याची क्षमता हे त्याचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य आहे. अमेरिका आणि भारतासह २३ हून अधिक देश या विमानाचा वापर करतात.
Web Summary : A Colombian Air Force plane carrying 110 soldiers crashed soon after takeoff in the south. The Lockheed Martin C-130 Hercules crashed near Puerto Leguizamo. The cause is unknown; a similar incident occurred in Bolivia earlier this year.
Web Summary : कोलंबिया में 110 सैनिकों को ले जा रहा वायुसेना का विमान उड़ान भरने के तुरंत बाद दक्षिण में दुर्घटनाग्रस्त हो गया। लॉकहीड मार्टिन सी-130 हरक्यूलिस प्यूर्टो लेगुइज़ामो के पास दुर्घटनाग्रस्त हो गया। कारण अज्ञात है; इसी तरह की घटना इस साल बोलिविया में हुई थी।