९०७ किलोचे बंकर-बस्टर बॉम्ब, अमेरिकेकडून मोठे हल्ले; कुठेही आसरा घ्या, इराण सुरक्षित नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 08:50 IST2026-03-31T08:48:40+5:302026-03-31T08:50:50+5:30

America Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

907 kg bunker buster bomb major attacks from america take shelter anywhere iran is not safe | ९०७ किलोचे बंकर-बस्टर बॉम्ब, अमेरिकेकडून मोठे हल्ले; कुठेही आसरा घ्या, इराण सुरक्षित नाही!

९०७ किलोचे बंकर-बस्टर बॉम्ब, अमेरिकेकडून मोठे हल्ले; कुठेही आसरा घ्या, इराण सुरक्षित नाही!

America Iran War: अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे इराण युद्धाबाबत अनेक दावे करत आहेत. परंतु, यातील बहुसंख्य दावे इराणकडून फेटाळले जात आहेत. अमेरिकेने चहुबाजूंनी वेढा देऊनही इराण काही माघार घेण्यास तयार नाही, उलट यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. अमेरिकेकडून हळूहळू हल्ल्यांची तीव्रता वाढवली जात असून, तब्बल ९०७ किलो वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर आता इराणवर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. अमेरिकेने इराणच्या इस्फहान या प्रमुख शहरातील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामावर हल्ला केल्याचे वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यात सुमारे ९०७ किलो वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणे हा या हल्ल्याचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. 

भूमिगत आणि तटबंदी असलेल्या सुविधांचे मोठे नुकसान

काही मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने यापूर्वी ७-८ मार्च रोजी या ठिकाणावर हल्ला केला होता. पुन्हा एकदा विध्वंस घडवण्यासाठी अमेरिकेने बंकर-बस्टर शस्त्रांचा वापर केला आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक बॉम्ब वापरण्यात आलाे ज्यामुळे भूमिगत आणि तटबंदी असलेल्या सुविधांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, इस्फहानमधील शस्त्रागार पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी खास तयार केलेल्या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. हे बॉम्ब जमिनीखाली खोलवर बांधलेल्या काँक्रीटच्या रचना भेदण्याची क्षमता ठेवतात. इस्फहानमधील शस्त्रागाराला लक्ष्य करण्यामागे इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणे हा मुख्य उद्देश होता. या हल्ल्यानंतर, संपूर्ण परिसरात प्रचंड स्फोटांचे आवाज घुमले.

 

Web Title: 907 kg bunker buster bomb major attacks from america take shelter anywhere iran is not safe