शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 8:21 PM

अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हिडीओंना लाखो व्ह्यूज

मुंबई: खेळण्यांच्या रिव्ह्यूमधून एका 7 वर्षीय मुलानं तब्बल 22 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. या मुलाचं नाव रेयान आहे. यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत रेयाननं पहिला क्रमांक पटकावला आहे. रेयानच्या व्हिडीओंना अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपये मिळतात. गेल्या वर्षभरात रेयाननं यूट्यूबवरील व्हिडीओंच्या माध्यमातून 22 मिलियन डॉलर्स (1,55,13,30,000 रुपये) कमावले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा त्याच्या कमाईत दुपटीनं वाढ झाली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूबर्सची यादी फोर्ब्स मासिकानं तयार केली आहे. यामध्ये रेयान टॉईज रिव्ह्यू हे यूट्यूब चॅनल चालवणारा रायन पहिल्या स्थानी आहे. रेयाननंतर जेक पॉल (21.5 मिलियन डॉलर्स) आणि 'द ड्यूड परफेक्ट' (20 मिलियन) यांचा क्रमांक लागतो. रेयानच्या कमाईत कर आणि एजंट-वकिलांचं शुल्क धरण्यात आलेलं नाही. लोकांचं मनोरंजन होत असल्यानं माझे व्हिडीओ पाहिले जात असावेत, असं रायननं एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं. रेयानच्या पालकांनी मार्च 2015 मध्ये रायन टॉईज रिव्ह्यू हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. रेयानच्या व्हिडीओला आतापर्यंत 26 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्या यूट्यूब फॉलोअर्सची संख्या 1.73 कोटी इतकी आहे. रायनची गेल्या वर्षभरातली कमाई 22 मिलियन इतकी आहे. यातले 1 मिलियन त्याला व्हिडीओ सुरू होण्याआधी दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळाले आहेत आणि बाकीची कमाई प्रायोजकांच्या माध्यमातून झाली आहे. 

रेयानच्या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या खेळण्यांची विक्री अगदी जोरात होते. त्यामुळेच वॉलमार्टनं रेयानला करारबद्ध केलं आहे. रेयान्स वर्ल्ड या नावाखाली वॉलमार्टकडून अमेरिकेच्या 2500 दुकानांमध्ये खेळण्यांची विक्री केली जाते. वॉलमार्टनं ऑगस्टमध्ये रेयान वर्ल्ड या नावानं कपडे आणि खेळण्यांचा ब्रँडदेखील लॉन्च केला आहे. यामधूनही रेयान कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.  

टॅग्स :YouTubeयु ट्यूब