रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:11 IST2025-07-25T06:11:26+5:302025-07-25T06:11:39+5:30

रशियातील टिंडा शहरापासून नजीकच्या ठिकाणी गुरुवारी एक प्रवासी विमान कोसळून त्यातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह सर्व ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

48 killed in plane crash in Russia; cause of accident still under investigation | रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

मॉस्को :रशियातील टिंडा शहरापासून नजीकच्या ठिकाणी गुरुवारी एक प्रवासी विमान कोसळून त्यातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह सर्व ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या देशाच्या आपत्कालीन स्थितीविषयक मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विन-टर्बोप्रॉप प्रकारातील हे विमान नेमके कशामुळे कोसळले याचे निश्चित कारण अद्याप कळू शकलेले नाही.

सैबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे असलेले हे विमान खाबारोव्हस्क येथून रशिया-चीन सीमेजवळील टिंडा शहराकडे चालले होते. या परिसरात हवामान अतिशय प्रतिकूल असल्याने या विमानाच्या उड्डाणात अडथळे निर्माण झाले असावेत असे म्हटले जात आहे. मात्र, त्याला रशियाच्या सरकारने दुजोरा दिला नाही. रशियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, ५० वर्षे जुने असलेल्या या विमानाचे अवशेष दाट जंगलामध्ये आढळून आले. जिथे हे विमान कोसळले तिथून धुराचे लोट येत असल्याचे यासंदर्भातील छायाचित्रे व व्हिडीओ फितींमध्ये दिसून येते. 

बचावकार्यातही अडथळे 
विमान कोसळलेला भाग दुर्गम असून घनदाट जंगलामुळे वेढलेला आहे. त्यामुळे बचाव कार्यातही अडथळे आल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या विमानाने टिंडा येथे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हे विमान रडारवरून दिसेनासे झाले. त्यानंतर ते कोसळल्याचे व त्याचे अवशेष जंगलात आढळून आले.

तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे विमान रद्द
नवी दिल्ली : येथील विमानतळावरून मुंबईच्या दिशने निघालेल्या एअर इंडियाच्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. बुधवारी सांयकाळी विमान उड्डाणाच्या तयारीत असताना कॉकपिटमधील स्पीड डिस्प्ले स्क्रीन अचानक बंद पडली. त्यामुळे ए ३२० या फ्लाईटचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

Web Title: 48 killed in plane crash in Russia; cause of accident still under investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.