Video: रशियात एमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाला आग; 41 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 08:01 AM2019-05-06T08:01:06+5:302019-05-06T08:20:37+5:30

मॉस्को विमानतळावरील घटना

41 dead in Russian planes fiery emergency landing | Video: रशियात एमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाला आग; 41 जणांचा मृत्यू

Video: रशियात एमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाला आग; 41 जणांचा मृत्यू

Next

मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंग दरम्यान सुखोई सुपरजेट 100 विमानाला आग लागली. यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. मॉस्कोच्या विमानतळावर ही घटना घडली. यावेळी अनेक प्रवाशांना एमर्जन्सी स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. 




सुखोई प्रवासी विमानानं मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. यामध्ये 73 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. विमानात दुर्घटनेवेळी एकूण 38 जण होते. यातल्या 41 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रवक्ते स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. याची माहिती वैमानिकानं विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानानं एमर्जन्सी लँडिंग केलं. 




विमानानं एमर्जन्सी लँडिंग लँडिंग करेपर्यंत त्याचा जवळपास निम्मा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात विमानाला लागलेल्या आगीची भीषणता अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. हे विमान दोन वर्षे जुनं होतं, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Web Title: 41 dead in Russian planes fiery emergency landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.