‘३६०, २५० वर्षांचे नागरिक घेताहेत सरकारी योजनांचा लाभ’, ट्रम्प यांनी सांगितली अमेरिकेतील भ्रष्टाचाराची सुरस कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:39 IST2025-03-05T15:37:39+5:302025-03-05T15:39:20+5:30
Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून विविध योजनांवर होणारा वायफळ सरकारी खर्च कमी करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा योजनांचा गैरफायदा घेऊन निधी हडप करणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची सुरस कहाणी ट्रम्प यांनी उघड केली आहे.

‘३६०, २५० वर्षांचे नागरिक घेताहेत सरकारी योजनांचा लाभ’, ट्रम्प यांनी सांगितली अमेरिकेतील भ्रष्टाचाराची सुरस कहाणी
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून विविध योजनांवर होणारा वायफळ सरकारी खर्च कमी करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा योजनांचा गैरफायदा घेऊन निधी हडप करणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची सुरस कहाणी ट्रम्प यांनी उघड केली आहे. तब्बल ३६०, २५० वर्षांचे नागरिक हडपताहेत सरकारी योजनांचा निधी हडप करत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात प्रगल्भ लोकशाही असलेला देश म्हणून टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या समोर आणल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये कशाप्रकारे सरकारी पैशांचा अपहार केला जात आहे. तसेच ३६०, २०० आणि १६० वर्षांचे अमेरिकन नागरिक निवृत्तीवेतन आमि सामाजिक सुरक्षा योजनांचा कसा काय लाभ उठवत आहेत, हे उघड केले.
याबाबतचा गौप्यस्फोट करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सामाजिक सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटींमुळे आमच्या देशाचं नुकसान होत आहे. आमच्याकडे ३६० वर्षांची एक व्यक्ती आहे जी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत आहे. म्हणजेच आधुनिक अमेरिकेची स्थापना झालली नव्हती त्याआधी १०० वर्षे आधी जन्माला आलेली व्यक्ती सोशल सिक्युरिटीचा फायदा घेत आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले की, यात १ लाख ३० हजार लोक असे आहेत ज्यांचं वय १६० वर्षांहून अधिक आहे. ते सोशल सिक्युरिटीचा धनादेश घेत आहे. १३ लाख लोक असे आहेत. ज्यांचं वय १५० ते १५९ वर्षे असून, ते सोशल सिक्युरिटीचा धनादेश घेत आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा व्यवस्था ही एखाद्या सामाजिक विम्याप्रमाणे काम करते. तसेच कठीण काळात लोकांना आर्थिक मदत देते. या योजनेच्या माध्यमातून निवृत्ती, अक्षमता, महागाई आणि मृत्यूनंतर कुटुंबाला संरक्षण दिलं जातं. या योजनेमुळे लाखो अमेरिकन नागरिकांचा जीवन स्तर उंचावला आहे. ही योजना देशातील सामाजिक कल्याण प्रणालीमधील महत्त्वपूर्ण भाग आहे.