शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इराणी कमांडर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी, चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:57 IST

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले आहेत.

तेहरान - अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे निवासस्थान असलेल्या करमेन शहरात सुरुवात झाली आहे. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले असून, गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या संदर्भातील वृत्त एपी या वृत्तसंस्थेने इराणी वृत्तवाहिन्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. शुक्रवारी इराकची राजदानी असलेल्या बगदाद येथे अमेरिकेने केलेल्या ड्रोण हल्ल्यात कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सुलेमानी यांना आज सुपूर्द- ए-खाक करण्यात येणार आहे. सुलेमानींचे निवास्थान असलेल्या करमेल येथून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली आहे. त्यावेळी आपल्या लाडक्या कमांडरला निरोप देण्यासाठी दहा लाखांहून अधिक इराणी नागरिक जमले आहेत. यावेळी चेंगराचेंरी झाल्याचेही वृत्त आहे. यात 35 जणांचा मृत्यू झाल्याचे एपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

 सुलेमानींचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या ताबूतावर इराणचा ध्वज लपेटण्यात आला आहे. तसेच सुलेमानी यांच्यासोबत त्यांचे निकटचे सहकारी असलेल्या ब्रिगेडियर जनरल हुसेन पुरजाफरी यांचेही पार्थिव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सुलेमानी यांना इराकची राजधानी असलेल्या बगदाद येथे, तसेच इराणची राजधानी असलेल्या तेहरान येथेही अंत्ययात्रा काढून अखेरचा निरोप देण्यात आला होता. तेहरान येथे सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयतुल्ला खोमेनी हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी आखरी नमाज वाचून सुलेमानी यांना निरोप दिला होता. 

सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी 

शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींच्या हत्येनं अमेरिकेचा खो

इराण –अमेरिका तणावामुळे भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चा 

शुक्रवारी संध्याकाळी कासिम सुलेमानी हे इराकमधील बगदाद विमानतळावर आले असतानाच अमेरिकेने तेथे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात कासिम सुलेमानी यांच्यासह काही लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.  . सुलेमानींचा मृतदेह त्यांच्या अंगठीवरून ओळखण्यात आला. सुलेमानी हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग 'कदस फोर्स'चे प्रमुख होते. 

टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीयqasem soleimaniकासीम सुलेमानी