मदागास्करमध्ये बस अपघातात 34 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 21:38 IST2017-08-01T21:35:57+5:302017-08-01T21:38:35+5:30

आफ्रिकेजवळील मदागास्करमध्ये बस अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

34 people die in bus accident in Madagascar | मदागास्करमध्ये बस अपघातात 34 जणांचा मृत्यू

मदागास्करमध्ये बस अपघातात 34 जणांचा मृत्यू

अंटानानॅरिवो, दि. 01 - आफ्रिकेजवळील मदागास्करमध्ये बस अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मदागास्करमध्ये काही तरुण ख्रिस्ती भाविकांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. ख्रिस्ती भाविक सोव्हिनंड्रियाना येथून वायव्येकडील भागात असलेल्या महाजांगा येथील एका चर्चमध्ये जात असताना हा अपघात घडला. या अपघातात 34 ख्रिस्ती भाविकांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत. तर, घटनास्थळी 12 मृतदेह अपघातात जळाल्याचे आढळून आले आहेत.
दरम्यान, बस टेकडीवर जाताना बस चालकाची खरी कसोटी लागते. यावेळी त्याचे बसवरील नियंत्रण सुटले की अपघात होण्यास वेळ लागत नाही. या अपघातात बस 20 फूट खोल दरीत कोसळली, असे येथील एका पोलिस अधिका-याने सांगितले. 


 

Web Title: 34 people die in bus accident in Madagascar