हलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:34 IST2018-10-15T13:32:43+5:302018-10-15T13:34:15+5:30
मला पाकिस्तानची तपास यंत्रणा एफआयएकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, पण एफआयएच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथील

हलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली!
कराची - पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बँक खात्यामध्ये 300 कोटींची रक्कम जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील तपास यंत्रणा एफआयएने या रिक्षाचालकाला नोटीस पाठविली आहे. मोहम्मद रशीद असे रिक्षाचालकाचे नाव असून तो कराचीचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, एफआयएने नोटीस पाठविल्यानंतर मोहम्मदला या रकमेच्या व्यवहाराचा उलगडा झाला.
मला पाकिस्तानची तपास यंत्रणा एफआयएकडून फोन आला आणि चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, पण एफआयएच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी मला माझ्या बँक खात्याचे तपशील दाखवले. कारण, माझ्या बँकेतील खात्यातून चक्क 300 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. रशीदने 2005 मध्ये एका खासगी कंपनीत कामाला असताना हे बँक खाते उघडले होते. मात्र, काही महिन्यातच रशीदने नोकरी सोडून दिली होती. रशीद भाड्याच्या घरात राहत असून कसाबसा त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे 300 कोटींची रक्कम ऐकून तोही अवाक झाला.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कराचीतील एका फळविक्रेत्याच्या बँक खात्यामध्ये 200 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे दहशतवादी फंडींगसाठी ही रक्कम पाठविण्यात येते का ? याचा तपास पाकिस्तानी तपास यंत्रणा एफआयएकडून सुरू आहे.