17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 19:20 IST2017-11-05T19:06:16+5:302017-11-05T19:20:04+5:30

अमेरिका- फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इंग्लिश शिक्षिकेला सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.

A 29-year-old teacher was arrested for sex with a 17-year-old student | 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक

17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक

अमेरिका- फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इंग्लिश शिक्षिकेला सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. 29 वर्षांची कॅरोलिन लॉसन ही फ्लोरिडातल्या रस्किनमधल्या लेन्नार्ड हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती.

परंतु तिने शाळेमधीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर असुरक्षितरीत्या शारीरिक संबंध ठेवले. लॉसन व त्या विद्यार्थ्यामध्ये शारीरिक संबंध असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीशी लॉसन हिने केलेल्या कथित मॅसेजच्या देवाण-घेवाणीतून उघड झाली आहे. त्यातूनच त्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी लॉसन या शिक्षिकेवर केला आहे. लॉसन त्या अज्ञात व्यक्तीला लिहिते, मी त्या अल्पवयीन विद्यार्थ्याची फसवणूक करतेय. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनंही लॉसन हिला प्रश्न विचारला, तू त्याची फसवणूक करतेस असं म्हणतेस, म्हणजे तुझे त्याच्याशी शारीरिक संबंध आहेत का ?, याला लॉसन या शिक्षिकेनंही होकारार्थी उत्तर दिलं आहे.

या प्रकारानंतर लॉसन हिनं शिक्षिकेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पोलिसांनी तिला तिच्या घरातून अटकही केली. अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत बेकायदेशीररीत्या लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यासंबंधी तिला 30 हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकारानंतर हिल्सबोरो काऊंटी प्रशासनानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं असून, या प्रकाराबाबत पालकांसह इतर शाळांना सावधानतेचा इशारा दिला आहे. लॉसन या ऑगस्ट 2014पासून शाळेत कार्यरत आहेत, आतापर्यंत त्यांच्याविरोधात एकही तक्रार आली नाही, असंही शाळा प्रशासनानं सांगितलं आहे. परंतु हिल्सबोरो काऊंटी प्रशासनानं अशा प्रकारांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

Web Title: A 29-year-old teacher was arrested for sex with a 17-year-old student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.