स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

By Admin | Updated: May 28, 2015 23:50 IST2015-05-28T23:50:19+5:302015-05-28T23:50:19+5:30

अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत.

25 Indians in the semi-finals of Spelling Bee | स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत. या स्पर्धेवर भारतीयांचे वर्चस्व असून गेल्या सहा वेळा अमेरिकन भारतीय मुलांनी ही स्पर्धा जिंकली आहे.
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी होत असलेल्या ८८ व्या राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न भारतीय मुले करतील. कित्येक वर्षापासून भारतीय अमेरिकन मुले ही स्पर्धा जिंकत आहेत. गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला मिसुरी येथील १४ वर्षांचा गोकुल व्यंकटाचलम या वर्षाचा मुख्य प्रतिस्पर्धी मानला जात आहे.
गेल्या वर्षाच्या स्पर्धेतील विजयी स्पर्धक श्रीराम हठवार व अंशुल सुजोय हे दोघे होते. दोघांना हा पुरस्कार वाटून मिळाला होता. स्पेलिंग बी स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणारी १३ वर्षांची वान्या शिवशंकर ही एक मजबूत प्रतिस्पर्धी मानली जात आहे. वान्याने २०१० व २०१२ साली, स्पर्धेत १० वा क्रमांक मिळवला होता. तिची बहीण काव्या २००९ ची विजेती होती.
नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा अमेरिकेत १९२५ साली सुरू झाली असून, यावर्षी अमेरिकेतील सर्व ५० राज्ये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला पुरस्कार म्हणून ३५ हजार डॉलर रोख मिळतील.

Web Title: 25 Indians in the semi-finals of Spelling Bee