‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 06:59 IST2023-02-03T06:59:26+5:302023-02-03T06:59:50+5:30

Breakup: आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे.

25 crores compensation claim on girlfriend for 'breakup' | ‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा

‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा

सिंगापूर : आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे.
त्याचे नाव के. कॉशिगन असून त्याची नोरा टॅन या युवतीशी मैत्री होती. २०१६ साली या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या युवतीबद्दल त्याच्या मनात प्रेमभावना जागृत झाली. मात्र, ती त्याला केवळ चांगला मित्र मानत होती. २०२० साली या दोघांचे मैत्रीसंबंध बिघडले. त्यानंतर गेल्या वर्षी ही मैत्री संपुष्टात आली. नोराशी मैत्री करून मनस्ताप झाल्याचा आरोप के. कोशिगन याने केला आहे. दोघांच्यात विसंवाद सुरू झाल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले; पण ती युवती एक दोन बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा तिथे वळली नाही. माझ्याशी मैत्रीसंबंध न राखल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी के. कोशिगनने दिल्याचा आरोप युवतीने केला होता. मात्र, तिच्या मित्राला हे आरोप मान्य नाहीत. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 25 crores compensation claim on girlfriend for 'breakup'