22 die in Ukraine military plane crash | युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार

युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले; 22 शिकाऊ सैनिक ठार

मॉस्को : युक्रेनच्या लष्कराचे विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घ़डली आहे. यामध्ये 22 जण ठार झाले आहेत. 


युक्रेनच्या लष्करी विमानातून एव्हीएशन स्कूलचे विद्यार्थी प्रवास करत होते. या मृतांसोबत अन्य दोन जण जखमी झाले असून चार जण बेपत्ता आहेत. An-26 हे विमान चुहुइव्ह विमानतळावर उतरताना कोसळले. युक्रेनची राजधानी क्यीव्हपासून 400 किमीवर ही घटना घडली आहे. 


या विमानातून लष्कर चालवित असलेल्या एव्हीएशन विद्यापीठाचे विद्यार्थी प्रवास करत होते. याबाबतची माहिती युक्रेनच्या संरक्षण विभागाने दिली आहे. विमानातून एकूण 28 जण प्रवास करत होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 22 die in Ukraine military plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.