इजिप्तमधील थडग्यांमध्ये आढळले २,००० वर्षांपूर्वीचे तामिळ-ब्राह्मी शिलालेख; इतिहासाचा नवा पैलू उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 08:45 IST2026-02-13T08:42:49+5:302026-02-13T08:45:21+5:30

प्राध्यापिका शार्लोट श्मिड यांनी रामेसेस सहावा यांच्या थडग्यासह खडकात कोरलेल्या सहा थडग्यांमध्ये तामिळ-ब्राह्मी, प्राकृत भाषेत असलेल्या ३० शिलालेखांचा शोध लावला आहे. 

2,000-year-old Tamil-Brahmi inscriptions found in tombs in Egypt; New aspect of history revealed | इजिप्तमधील थडग्यांमध्ये आढळले २,००० वर्षांपूर्वीचे तामिळ-ब्राह्मी शिलालेख; इतिहासाचा नवा पैलू उजेडात

इजिप्तमधील थडग्यांमध्ये आढळले २,००० वर्षांपूर्वीचे तामिळ-ब्राह्मी शिलालेख; इतिहासाचा नवा पैलू उजेडात

चेन्नई - इजिप्तमधील ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ येथे राजघराण्यातील व्यक्तींच्या थडग्यांमध्ये २,००० वर्षांपूर्वीचे तामिळ, ब्राह्मी शिलालेख संशोधकांना आढळून आले आहेत. त्यामुळे प्राचीन भारतातील व्यापाऱ्यांच्या इतिहासातील आजवर दडलेल्या अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

प्राचीन काळी तामिळ व्यापारी सागरी प्रवास करत इजिप्तपर्यंत पोहोचले होते. ते त्या देशाच्या अंतर्गत भागातही प्रवास करत होते, हे या शिलालेखांमुळे दिसून आले आहे. तामिळनाडू राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने चेन्नई येथे ११ फेब्रुवारीपासून आयोजिण्यात आलेल्या चार दिवसीय  आंतरराष्ट्रीय तामिळ अभिलेख परिषदेत पहिल्या दिवशी स्वित्झर्लंडमधील लॉझान विद्यापीठातील प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी आपल्या सादरीकरणात ही माहिती दिली.  प्राध्यापक स्ट्रॉच व पॅरिस येथील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्राध्यापिका शार्लोट श्मिड यांनी रामेसेस सहावा यांच्या थडग्यासह खडकात कोरलेल्या सहा थडग्यांमध्ये तामिळ-ब्राह्मी, प्राकृत भाषेत असलेल्या ३० शिलालेखांचा शोध लावला आहे. 

‘सिकै कोरन’ हे नाव ८ वेगवेगळ्या ठिकाणी 

३० शिलालेखांपैकी ‘सिकै कोरन’ हे नाव ८ वेगवेगळ्या ठिकाणी आढळणे हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. त्यातील एका शिलालेखात सिकाई कोरान वर कंता असे लिहिले आहे. त्याचा अर्थ ‘सिकै कोरन आला आणि त्याने पाहिले’ असा होतो. हा उल्लेख त्याच संकुलात आढळलेल्या ग्रीक पर्यटकांच्या शिलालेखांच्या शैलीशी साधर्म्य दर्शवितो.

‘भारतीय व्यापाऱ्यांचे इजिप्तमध्ये प्रदीर्घ काळ वास्तव्य’

प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी सांगितले की, तामिळी लोक प्राचीन काळी इजिप्तमध्ये जात असत याचे पुरावे बेरेनिकेसारख्या बंदरांमध्येच आढळत होते. भारतीय व्यापारी इजिप्तमध्ये व्यापारासाठी येत, तिथे प्रदीर्घ काळ वास्तव्य करत याचे पुरावे आता ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ येथील तामिळ, ब्राह्मी शिलालेखांतून पुढे आले आहेत. ‘सिकै’ या शब्दाचा अर्थ शेंडी किंवा मुकुट, तर ‘कोरन’चा अर्थ नेता असा होतो. यावरून संबंधित व्यक्ती प्राचीन ऐतिहासिक काळातील व्यापारी वर्गामध्ये महत्त्वाची व्यक्ती म्हणून गणली जात असावी, असेही स्ट्रॉच म्हणाले.

Web Title : मिस्र में मिली प्राचीन तमिल-ब्राह्मी शिलालेख, व्यापार इतिहास का पुनर्लेखन।

Web Summary : मिस्र के मकबरों में 2,000 साल पुराने तमिल-ब्राह्मी शिलालेख मिले, जो प्राचीन तमिल व्यापारियों की मिस्र में उपस्थिति दर्शाते हैं। 'सिकै कोरन' जैसे शिलालेख भारतीय व्यापारियों की बंदरगाह शहरों से परे उपस्थिति का सुझाव देते हैं, जिससे प्राचीन व्यापार संबंधों पर प्रकाश पड़ता है।

Web Title : Ancient Tamil-Brahmi inscriptions found in Egypt, rewriting trade history.

Web Summary : 2,000-year-old Tamil-Brahmi inscriptions discovered in Egyptian tombs reveal ancient Tamil traders reached and resided in Egypt. The inscriptions, including the name 'Sikai Koran,' suggest prolonged Indian merchant presence beyond port cities, unveiling new insights into ancient trade relations.

टॅग्स :historyइतिहास