Pakistan Blast: पाकच्या खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये स्फोट, 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 13:37 IST2018-11-23T13:35:55+5:302018-11-23T13:37:35+5:30
पाकिस्तानच्या कराचीतीली चिनी दूतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला केल्यानंतर खैबर पख्तूनख्वातील हंगू हे शहर स्फोटानं हादरलं आहे.

Pakistan Blast: पाकच्या खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये स्फोट, 20 जणांचा मृत्यू
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या कराचीतीली चिनी दूतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला केल्यानंतर खैबर पख्तूनख्वातील हंगू हे शहर स्फोटानं हादरलं आहे. या स्फोटात 20 लोकांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी आहेत. या परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आहे. स्फोट कसा झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. स्थानिक न्यूज चॅनेल जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, एका धार्मिक स्थळाच्या बाहेर स्फोट झाला आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Ten killed, many injured in a blast in Hangu, Khyber Pakhtunkhwa: Geo News #Pakistanpic.twitter.com/DKYWFOlyuX
— ANI (@ANI) November 23, 2018