अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले; लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:29 IST2025-09-28T05:28:34+5:302025-09-28T05:29:49+5:30
अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे.

अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले; लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
पोर्टलँड/ऑरेगॉन : अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे. स्त्री-पुरुष अशा दोनच लिंगांव्यतिरिक्त विविध लिंग ओळख दर्शवणारे अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात ठेवणे म्हणजे संघीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा इशारा देत यासंबंधीचा निधी थांबवण्याची धमकी या राज्यांना ट्रम्प प्रशासनाने दिली आहे.
ऑरेगॉनमधील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या लैंगिक श्रेणी हटवण्याच्या दृष्टीने लैंगिक आरोग्यविषयक अभ्यासक्रम बदलण्यास भाग पाडत आहे. ऑरेगॉन संघीय न्यायालयात दाखल याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे लैंगिक बदल वा तृतीयपंथीयांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे.