शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

१५९ वर्षांपूर्वी अमेरिका-रशिया यांच्यात 'पांढऱ्या सोन्याची' डील; ग्रीनलँडवर पुतिन यांच्या वक्तव्यामुळे समोर आली अलास्काची खरी स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:17 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅन्डबाबात केलेल्या विधानामुळे १५९ वर्षापूर्वीच्या अमेरिका आणि रशियातील अलास्का कराराची चर्चा सुरू आहे. रशियाने १८६७ मध्ये "पांढरे सोने" म्हणून ओळखले जाणारे अलास्का अमेरिकेला विकले.

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याबाबत धमकी दिली आहे. ट्रम्प यांची नजर ग्रीनलँडमध्ये असलेल्या खजिन्यावर आहे. ग्रीनलँडमध्ये ग्रॅफाइट आणि लिथियमचे साठे आहेत. या ठिकाणी कोट्यवधी टन दुर्मिळ खनिजे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प २०१९ मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील ग्रीनलँडबाबत इरादा जाहीर केला होता. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही ग्रीनलँडबाबत भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. ग्रीनलँड हा एकटाच असा प्रदेश नाही, त्याला अमेरिका विकत घेण्याचा विचार करत आहे. ग्रीनलँडच्या आधी अमेरिकानेरशियाकडून एक असा प्रदेश विकत घेतला आहे, त्याला 'पांढरे सोने' उगवणारी जमीन मानली जात होती.

जम्मू-काश्मीर: भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळले; १० जवान शहीद, अनेक गंभीर जखमी

अमेरिका आणि रशिया यांच्यातील "अलास्का करार"

१५९ वर्षांपूर्वी, १८६७ मध्ये, अमेरिका आणि रशिया यांच्यात एक करार झाला. या करारांतर्गत, रशियाने "पांढरे सोने" म्हणून ओळखले जाणारे अलास्का अमेरिकेला विकले. रशियाने हा करार अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वेच्छेने केला.

१८ व्या शतकात रशियन नागरिक पीटर द ग्रेट यांनी पूर्व आशियाई खंडाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्याची व्याप्ती निश्चित करण्याचा प्रयत्न केला. या प्रदेशाचे नाव अलास्का ठेवण्यात आले आणि त्याच्या शोधानंतर ते रशियाचा भाग बनले.

अलास्काच्या नैसर्गिक संसाधनांमुळे रशियन व्यापार वाढला. या प्रदेशात उत्पादित होणाऱ्या फरांना "पांढरे सोने" म्हणून ओळखले जात होते. रशियन व्यापाऱ्यांनी फर सोन्यासारखे विकले. रशियाने येथे राहणाऱ्या लोकांकडून संसाधने हिसकावून घेतली, पण त्यांच्या जीवनाकडे लक्ष दिले नाही.

रशियाला अलास्का का विकावा लागला?

अलास्का एकेकाळी रशियाला मुबलक सोने पुरवत होता, पण एक वेळ अशी आली ज्यावेळी त्याचे व्यवस्थापन करणे हे रशियासाठी सर्वात मोठे आव्हान बनले.

१८५३ ते १८५६ दरम्यान रशियाने क्रिमियन युद्ध लढले. फ्रान्स, ब्रिटन, सार्डिनिया आणि तुर्की एकमेकांशी युती करत होते, तर रशिया दुसऱ्या बाजूला लढला. या युद्धाचा रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला.

रशियाचा तिजोरी संपत असताना, अलास्का नियंत्रित करणे अधिकाधिक कठीण झाले होते, कारण रशिया आणि अलास्कामधील अंतर हजारो किलोमीटर होते. अलास्का व्यवस्थापित करणे रशियासाठी अधिकाधिक महाग झाले.

याशिवाय, अलास्काचा रशियासोबतचा व्यापारही कमी होऊ लागला, कारण व्यापाराच्या सुरुवातीला समुद्री ओटर्सची इतक्या वेगाने शिकार केली जात होती की त्यांची संख्या कमी होऊ लागली आणि अलास्कातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर आला.

अमेरिकेला अलास्का कसे मिळाले?

रशियासाठी अलास्का व्यवस्थापित करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. रशियाचा शत्रू ब्रिटनचीही नजर अलास्कावर होती. रशियाला अलास्का ब्रिटनला देऊन आपल्या शत्रूला अधिक सक्षम करायचे नव्हते.

रशियाने अलास्कावर एक मोठा जुगार खेळला आणि अमेरिकेला हा प्रदेश खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळी रशियालाही आपल्या सीमा वाढवायच्या होत्या.

अमेरिकेला अलास्का विकून, रशियाने एका दगडात दोन पक्षी मारण्यात यश मिळवले. अमेरिका आणि ब्रिटनमधील तणावाची रशियाला आधीच जाणीव होती आणि अलास्का अमेरिकेला दिल्याने ही दरी आणखी वाढली. यावेळी अलास्काच्या बदल्यात ७.२ मिलियन डॉलर्स मिळाल्याने रशियाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Alaska's story: Russia's 'white gold' deal with America 159 years ago.

Web Summary : 1867: Russia sold Alaska, rich in resources, to America for $7.2 million. Facing economic hardship after the Crimean War and fearing British acquisition, Russia strategically strengthened America against Britain and boosted its finances.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका