शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

रशियातून 150 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 5:45 PM

रशियाने अमेरिका व युरोपीय देशांच्या 150 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी करणार असून, सेंट पीटर्सबर्गमधील अमेरिकेचा दूतावासही बंद करण्यात येणार आहे.

मॉस्को - रशियाने अमेरिका व युरोपीय देशांच्या 150 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली असून, सेंटपीटर्सबर्गमधील अमेरिकेचा दूतावासही बंद करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील रशियाचा माजी गुप्तहेर स्क्रिपल व अजून दोघांवर नर्व्ह एजंटचा जीवघेणा प्रयोग करण्यात आला.यामागे रशियाचा हात असल्याचा आरोप करून ब्रिटन व काही युरोपीय देश तसेच अमेरिकेने रशियाच्या 150 राजनैतिक अधिका-यांची नुकतीच हकालपट्टी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया ही तितक्याच राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी करणार असून, त्यात अमेरिकेच्या साठ राजनैतिक अधिका-यांचा समावेश आहे. त्यांना 5 एप्रिलपर्यंत रशियातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेनंही रशियाच्या 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली होती. अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वी 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली होती. तसेच अमेरिकेनं रशियाचं सिएटल येथील दूतावास बंद करण्याचे आदेशही दिले होते. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. ब्रिटनच्या गुप्तहेराला विष देण्याच्या प्रकरणात रशियाचाही हात असल्याचा युरोपियन महासंघाचा आरोप होता. त्यामुळेच अमेरिकेनं 60 राजनैतिक अधिका-यांना निलंबित करत रशियाचं सिएटल येथील दूतावासही बंद करण्याचे आदेश दिले होते. 

 

 

 

टॅग्स :russiaरशिया