शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:00 IST

Hindu Girl Kidnapping in Pakistan: घटना उघ़डकीस आल्यानंतर परिसरात उडाली खळबळ

Hindu Girl Kidnapping in Pakistan: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका १५ वर्षीय हिंदू मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. नंतर तिचे लग्न लावले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मानवाधिकार आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचा बालेकिल्ला मानला जातो.

डॉन वृत्तपत्रानुसार, सिंध प्रांतातील मातली गावात ४५ वर्षीय व्यक्तीने मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीनुसार, ४ तरुणांनी प्रथम त्याच्या घरात घुसून नंतर त्याच्या १५ वर्षीय भाचीला पळवून नेले. काही वेळाने त्याच्या भाचीचे लग्न लावले गेल्याची बातमी समोर आली. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची विनंती त्या व्यक्तीने केली आहे.

मानवाधिकार आयोग सक्रिय, परिसरात दहशत

बंदुकीच्या धाकावर मुलीचे ज्या पद्धतीने अपहरण करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी व्यक्तीची ओळख पटली आहे. दोन आरोपींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यांची नावे मन्सूर डार आणि मकसूद डार अशी आहेत. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मानवाधिकार आयोगाने पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ३६५-ब, ३६४-अ आणि ५०६ अंतर्गत या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच, आयोगाने मुलीची तात्काळ सुटका करण्याचेही आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीशी लग्न करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारने याबाबत कठोर कायदा लागू केला आहे. उल्लंघन करणाऱ्या आरोपींना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूKidnappingअपहरणmarriageलग्न