कॅनडातल्या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, 15 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 10:40 IST2018-05-25T10:39:02+5:302018-05-25T10:40:14+5:30

कॅनडातलं एक भारतीय रेस्टॉरन्ट भीषण स्फोटानं हादरलं आहे.

15 people injured in blast at restaurant in canada | कॅनडातल्या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, 15 जण जखमी

कॅनडातल्या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये स्फोट, 15 जण जखमी

टोरंटो- कॅनडातलं एक भारतीय रेस्टॉरन्ट भीषण स्फोटानं हादरलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोरंटो शहरातल्या उपनगरीय भागातल्या मिसिसॉगामधल्या बॉम्बे भेल या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पील रिजनल पॅरामेडिक सर्व्हिसनं ट्विट करत सांगितलं की, 3 लोकांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा स्फोट झाला आहे. परंतु स्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीही टोरंटोमध्ये एका ड्रायव्हरनं स्वतःची गाडी गर्दी घुसवली होती. ज्यात 10 लोक ठार झाले होते, तर 15 जण जखमी होते.



 

Web Title: 15 people injured in blast at restaurant in canada