South Africa : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार, 14 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:31 IST2022-07-10T14:30:35+5:302022-07-10T14:31:38+5:30
South Africa : ही घटना जोहान्सबर्गमधील सोवेटो टाऊनशिपमध्ये घडली.

South Africa : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार, 14 जणांचा मृत्यू
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील एका बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना जोहान्सबर्गमधील सोवेटो टाऊनशिपमध्ये घडली.
पोलीस लेफ्टनंट इलियास मावेला यांनी सांगितले की, काल रात्री 12.30 च्या सुमारास गोळीबार झाला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तोपर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला होता. तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचारानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बारमध्ये हल्ला झाला, तो वाटोच्या ओरलँडो जिल्ह्यात आहे. जोहान्सबर्गमधील ही सर्वात मोठी वस्ती आहे. हल्लेखोर मध्यरात्री बारमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या 9 जणांवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलीस लेफ्टनंट इलियास मावेला म्हणाले, "प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बारमध्ये लोक एन्जॉय करत होते. यादरम्यान हल्लेखोर याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे."