शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 17:37 IST

नैरोबी पोलिसांच्या या गोळीबारात मारल्या गेलेल्या मुलाचे नाव, यासीन हुसैन मोयो असे आहे.

ठळक मुद्देया गोळीबारत 13 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहेमुलाला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी वडिलांनी एकतास केली पोलिसांची गयावयाकेनियात कर्फ्यू लगल्यापासून आतापर्यंत 16 जणांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे

नैरोबी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केनियामध्येपोलिसांनी सक्तीने लॉकडाउनची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. नैरोबीच्या एका भागात मंगळवारी आपल्या घराच्या बालकनीत उभ्या असलेल्या एक कुटुंबावर पोलिसांनीगोळीबार केला. या गोळीबारत 13 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या या गोळीबारात मारल्या गेलेल्या मुलाचे नाव, यासीन हुसैन मोयो असे आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब घराच्या बालकनीमध्ये उभे होते. यावेळी घराखालून जाणाऱ्या पोलिसांच्या एका तुकडीतील काही पोलिसांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. यात त्यांच्या 13 वर्षांच्या मुलाच्या पोटात गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. मुलाला गोळी लागल्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा वेळीही पोलीस त्यांचे ऐकत नव्हते. 

Lockdown : ITBPच्या जवानाचं 'हे' कोरोनागीत तुमच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही

रुग्णालयात जाण्यासाठीही गयावया -मोयोचे वडील म्हणाले, मुलाला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी मला पोलिसांची जवळपास एक तास गयावया करावी लागली. कारण कर्फ्यूमुळे त्यांना रुग्णालयात जाऊ दिले जात नव्हते. माझा मुलगा घराच्या बालकनीमध्ये उभा होता. त्याने कर्फ्यूचे उल्लंघनही केले नव्हते, असे असतानाही पोलिसांनी गोळीबार करणे लज्जास्पद आहे. केनियात कर्फ्यू लगल्यापासून आतापर्यंत 16 जणांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

हे तर मानवाधिकाराचे खुले उल्लंघन -एमनेस्टी इंटरनॅश्नलचे केनियाचे डायरेक्टर इरुंगू हाफ्तन यांनी  सीएनएनशी बोलताना सांगितले, की लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आवश्यकतेपेक्षा बळाचा अधिक वापर करत आहे. येथील लोक कोरोनामुळे आधीच दहशतीखाली आहेत. असे असताना, पोलिसांचे अशा पद्धतीने वागणे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. सोशल मीडियावर, पोलीस जनतेला निर्दयपणे मारत असल्याचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे मानवाधिकाराचे खुले उल्लंघन आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे, की लोक सातत्याने लॉकडाउन आणि क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. अनेक ठिकाणी तपासणीसाठी जाणाऱ्या पोलिसांवर लोक हल्ला करत आहेत.

Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkenyaकेनियाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलFiringगोळीबार