शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

10 दिवसांची सामूहिक सुट्टी जाहीर; तरीही जपानी नाराज...वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 16:23 IST

जपानचे सम्राट अकिहितो हे आपली राजगादी राजपूत्र नारुहितो यांच्याकडे सोपविणार आहेत.

योकोहामा : तुम्हाला कंपनीने किंवा देशाने उत्सव साजरा करण्यासाठी तब्बल 10 दिवसांची सुट्टी दिली तर. किती आनंद होईल ना? पण जपानचे नागरिक 10 दिवसांची सामुहिक सुट्टी मिळूनही नाखुश आहेत. कारणही असे आहे की विश्वास बसणार नाही. 

जपानचे सम्राट अकिहितो हे आपली राजगादी राजपूत्र नारुहितो यांच्याकडे सोपविणार आहेत. यामुळे प्रशासनाने देशभरात सामुहिक 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. जपानी लोक यामुळे आनंदीत होतील अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या बातमीमध्ये एवढी मोठी सुट्टी जपानच्या लोकांना आवडलेली नाही. याबाबत उघड उघड नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. 

जपानमध्ये 27 एप्रिल ते 6 मे पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आली. याबाबत लोकांची मतेही जाणून घेण्यात आली. यावरून असे लक्षात आले की निम्म्याहून अधिक कामगार वर्ग यामुळे खूश नाहीय. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला आणि निवृत्त लोकांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये सुट्टीमुळे त्रस्त झालेल्या लोकांची संख्या जास्त होती. 

वृत्तपत्रांमधूनही टीकाकाही वृत्तपत्रांनी एवढ्या दिवसांची सुट्टी जाहीर करणे हा या शतकातील सर्वात वाईट विचार असल्याचे म्हटले आहे. यामुळे केवळ श्रीमंत व्यक्ती खुश आहेत. ही 10 दिवसांची सुट्टी पुढे जाऊन 10 दिवस जास्त काम करण्यासाठी भाग पाडेल. 

जपानची जनता का नाराज आहे...जपानचे लोक सुट्ट्यांमुळे नाखुश आहेत. काहींचे म्हणणे आहे की या काळात प्रवास महागणार आहे. काहींनुसार पर्यटन स्थळांवर गर्दी वाढेल. तर अनेकजण बँक, बालसंगोपन केंद्र बंद असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. सुट्टीमुळे कामगारांवर अत्याचार वाढेल. तसेच सुट्टीकाळात त्यांच्याकडून जादाचे काम करून घेतले जाईल.

टॅग्स :Japanजपान